परिसरातील वारंवार हाेनार्या चाेर्यांमुळे नागरीक भयभीत
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील पळसखेडे शिवारातील देवदत्त सोमनाथ घुगे यांच्या शेतीमध्ये रोवलेले लोखंडी अँगल चोरल्याची घटना रविवारी (दि. 26 मे) उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की निमोण येथील देवदत्त घुगे यांची पळसखेडे शिवारात गट क्रमांक 433 मध्ये शेती आहे. या शेतीमध्ये आठ फुटाचे 42 लोखंडी अँगल रोवलेले होते. ते भाऊसाहेब नाना घुगे, पोपट पुंजा घुगे व नवनाथ नाना घुगे (सर्व रा. निमोण) यांनी चोरून नेले. याप्रकरणी देवदत्त घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. सहाणे करत आहेत. संगमनेरात सुरू असलेल्या चोरी सत्राचा तपास लागत नसतांनाच वारंवार चोर्या सुरू आहे. त्यामुळे नागरीक भयभीत असून पोलीसांनी या चोरट्यांचा तपास करावा.