
श्रीरामाच्या पूजेसाठी अयोध्येसारखेच संगमनेर सजले

प्रभू रामचंद्रांचं वनवासावरून पुन्हा अयोध्येत आगमन झाल्यानंतर नववधू सारख्या सजलेल्या अयोध्येचं वर्णन करणार्या या सुंदर ओळी.
प्रभू रामचंद्र वनवासाहून पुन्हा अयोध्येत आले तेव्हा फक्त आयोध्या नगरी सजली होती मात्र पाचशे वर्षांचा वनवास संपवून 2024 झाली प्रभु पुन्हा आले तेव्हा अवघा देश त्यांच्या स्वागतासाठी सजला होता.
राम.. अर्थात या देशाचा आत्मा,या देशाचा प्राणवायू आणि या देशाचा डीएनए. दरवर्षी आपल्याला दिवाळीत बोनस मिळतो मात्र यावर्षी देशाला बोनस मध्ये दिवाळी मिळाली.
देशाच्या प्रत्येक राम भक्ताला अयोध्येत जाण्याची इच्छा होती मात्र ते शक्य नव्हतं. मग काय, त्यांनी आपापल्या शहरातच आयोध्या उभी केली. त्या सुंदर अयोध्येचं एक छोटं स्वरूप संगमनेराही बघायला मिळाला.
प्राणप्रतिष्ठेच्या अगदी तीन-चार दिवस आधीपासूनच गाव रोषणाईत उजळून निघालं होतं. लोकांनी उत्स्फूर्तपणे घरावर लाइटिंग आकाश कंदील लावले होते. अगदी दिवाळीलाही लाजवेल इतकं सुंदर वातावरण संगमनेरात निर्माण झालं होतं.

22 जानेवारीला संगमनेरच्या चौका चौकात गुढ्या उभारल्या गेल्या, आकर्षक रांगोळ्यांनी रस्ता न रस्ता सजला होता, चौका चौकातील गणेश मंडळांनी पताका, ध्वज यांनी वातावरण अगदी भारावून टाकलं होतं. अगदी गल्ली बोळातल्या रस्त्यांवरून फिरताना असं वाटत होतं की जणू याच रस्त्यांवरून प्रभू रामचंद्र चालत येणार आहेत. या दिवसाचे महत्व प्रत्येक अबालवृद्धाला माहिती होतं त्यामुळे प्रत्येक जण प्रभूंच्या स्वागतासाठी मला काय करता येईल या लगबगीत दिसत होता. गावातील चंद्रशेखर चौक, रंगार गल्ली ,नेहरू चौक कॅप्टन लक्ष्मी चौक, साळीवाडा, मेन रोड साईनाथ चौक व्यापारी मित्र मंडळ, बाजारपेठ शिवाय उपनगरातील सर्व मंडळांनी चौका चौकात स्पीकरवर दिवसभररामाची भजन लावली होती,प्रभू रामचंद्रांचे फोटो,मुर्त्या चौकाचौकात उभारण्यात आल्या होत्या.
गावातील प्रत्येक नागरिक अक्षरशः आपल्या घरातलं कार्य असल्याप्रमाणे या आनंदात सहभागी झाला होता. खरंच आपली पिढी किती भाग्यवान आहे की आपल्याला हा दिवस आपल्या आयुष्यात बघायला मिळाला. प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सर्वांना सोबत बघता यावा यासाठी अनेक मंडळांनी रस्त्यांवर लाईव्ह स्क्रीनिंग ची व्यवस्था केली होती. अयोध्येत पंतप्रधानांच्या हस्ते राम ललाची प्राणप्रतिष्ठा होत असतानाचा तो क्षण प्रत्येक संगमनेरकराने आपल्या डोळ्यात आयुष्यभरासाठी साठवून घेतला. यावेळी चौका चौकात शंख, ढोल ताशे, नगारे या वाद्यांच्या गजरावर आभार वृद्ध नागरिकांनी नाचून आपला आनंद साजरा केला. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या घरात होता मात्र आपल्या संगमनेरातून राजेश भाऊ मालपाणी, संजू भाऊ मालपाणी, गिरीश डागा असे काही मान्यवर आपल्या सर्वांतर्फे आयोध्यात प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमास उपस्थित होते. शिवाय काही भाग्यवान कारसेवकही त्या दिवशी अयोध्येत जाऊ शकले. ध्यानीमनी नसतानाही या भाग्यवान कार सेवकांना त्यादिवशी रामाच्या कृपेने अयोध्येत उपस्थित राहण्याची संधी मिळाली. संध्याकाळी अनेक मंडळांनी आपापल्या मंदिरात महाआरत्यांचे आयोजन केले होते. चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात संध्याकाळी भास्कर संगीत विद्यालयाचा राम विजय गुणगान हा सुरेल गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारो नागरिक रामभजनांच्या भक्तीरसात अगदी तल्लीन होऊन गेले.
सौ शहरी एक संगमनेरी असं ज्या संगमनेर बद्दल बोललं जातं त्या संगमनेरात किती उत्साही लोक राहतात याची प्रचितीच जणू 22 तारखेला आली.
पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, अनेक लढाया लढून ज्या पद्धतीने रामललांचं मंदिरात आगमन अपेक्षित होतं अगदी त्याच उत्साहाने संपूर्ण देशाने रामललांचं स्वागत केलं ज्यात संगमनेरही अगदी आघाडीवर होतं.या संगमनेरने रामाचं मंदिर होण्यासाठी जेवढ्या कार सेवा झाल्या त्यातही अनेक कार सेवक दिले याचा एक संगमनेरकर म्हणून कायमच अभिमान वाटतो आणि वाटत राहील. जय श्रीराम.

- सर्वेश देशपांडे, संगमनेर
8857821827




















