संगमनेरला दहा आधुनिक ई-टॉयलेट्स उभारणार -आ. खताळ

0
4224

संगमनेरात स्वच्छता गृहाची समस्या गंभीर बनलेली होती. त्यातच महिलांच्या स्वच्छता गृहांचा प्रश्‍न बिकट बनलेला होता. यावर उपाय म्हणून एक वर्षापूर्वी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून एक कोटी रुपयांच्या दहा आधुनिक ई -टॉयलेट मंजूर करून आणले होते. सदर ई -टॉयलेट संगमनेरात दाखल देखील झाले आहे. परंतु नगरपालिकेकडून अद्याप त्यासाठी जागा निश्‍चित करून न दिल्याने हे ई टॉयलेट सध्या धुळखात पडून असल्याची परिस्थिती आहे. अशातच आता नुतन आमदार अमोल खताळ यांनी देखील नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून दहा ई -टॉयलेट मंजूर करून आणल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता संगमनेरकर नागरिक संभ्रमात पडले असून या आधुनिक ई-टॉयलेट वरून दोन आमदारांमध्ये चांगलाच श्रेयवाद रंगला आहे.

संगमनेर शहराचा विस्तार जसा वाढत गेला तसे शहरातील स्वच्छता गृहाची संख्या कमी होत गेली. त्यामुळे नागरिकांना बसस्थानक, नेहरू चौक, तहसील कचेरीजवळ, तसेच मोजक्याच ठिकाणी असलेल्या स्वच्छता गृहांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे महिला नागरीकांची गरज ओळखून आ. तांबे यांनी 30 जानेवारी 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे याबबात मागणी केली होता. त्यास 21 फेब्रुवारी 2024 मध्ये मान्यता मिळाली. याबाबत त्यांनी येथील पत्रकारांसमोर दिवाळीत प्रेझेंटेशन सादर केले होते. शहरात तातडीची गरज असताना मात्र जागेची अडचण येत असल्याने हे ई टॉयलेट तसेच पडून आहे. मात्र आता आ. खताळ यांनी देखील आपल्या पुढाकारातून ई टॉयलेट मंजूर झाले असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून सांगितल्याने या श्रेयवादाला तोंड फुटले आहे.

संगमनेर (प्रतिनिधी)
संगमनेर शहरामध्ये स्वच्छता गृहाची गंभीर समस्या बनली होती ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. विशेष अनुदानातून संगमनेर शहरामध्ये 10 आधुनिक ई-टॉयलेट्स उभारले जाणार आहे. त्यासाठी 1 कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहे. या ई-टॉयलेट च्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य सुधारणा आणि स्वच्छतेच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल पडणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.
या ई टॉयलेट प्रकल्पात आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर केला असून, स्मार्ट सेन्सर तंत्रज्ञान, टचलेस ऑपरेशनसाठी सोलर लाइटिंग सिस्टम व पर्यावरणपूरक ऊर्जा वापरासाठी वॉटर रिसायकलिंग युनिट्स यांचा वापर करण्यात आला आहे. तसेच त्या पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची बचत केली जाणार आहे. आणि महिलांसाठी स्वच्छ व सुसज्ज टॉयलेट्स स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे खताळ म्हणाले.

महायुती सरकारमुळे प्रकल्पाला वेग
महायुतीच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाच्या कामांना गती मिळाली आहे. विशेषतः नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने आदेश देऊन हे काम सुरू करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होईल.
-आ. अमोल खताळ

संगमनेरात स्वच्छता गृहाची समस्या गंभीर बनलेली होती. त्यातच महिलांच्या स्वच्छता गृहांचा प्रश्‍न बिकट बनलेला होता. यावर उपाय म्हणून एक वर्षापूर्वी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून एक कोटी रुपयांच्या दहा आधुनिक ई -टॉयलेट मंजूर करून आणले होते. सदर ई -टॉयलेट संगमनेरात दाखल देखील झाले आहे. परंतु नगरपालिकेकडून अद्याप त्यासाठी जागा निश्‍चित करून न दिल्याने हे ई टॉयलेट सध्या धुळखात पडून असल्याची परिस्थिती आहे. अशातच आता नुतन आमदार अमोल खताळ यांनी देखील नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून दहा ई -टॉयलेट मंजूर करून आणल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता संगमनेरकर नागरिक संभ्रमात पडले असून या आधुनिक ई-टॉयलेट वरून दोन आमदारांमध्ये चांगलाच श्रेयवाद रंगला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here