![](https://yuvavarta.in/wp-content/uploads/2024/04/Om-Gore-1-1024x539.jpg)
राजूरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
प्रवरानगर (प्रतिनिधी)
लोणी तालुका राहता येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागाच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या ओम रावसाहेब गोरे (वय २३) या विद्यार्थ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
याबाबत माहिती अशी की, ओम गोरे नेहमीप्रमाणे आज सोमवारी सकाळी प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयात गेला होता. महाविद्यालयाची फी अकाउंट सेक्शन मध्ये भरत असतानाच ओम गोरे याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. तेथील उपस्थित विद्यार्थ्यांनी त्याच्याठी ताबडतोब ऍम्ब्युलन्स बोलावली. एक व्यक्तीने छातीवर सी पी आर देण्याचा प्रयत्नही केला मात्र तोपर्यंत ओमची प्राणज्योत मालवली होती. अगदी काही क्षणात त्याला प्रवरा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
राहता तालुक्यातील राजूरी येथील रहिवासी असलेला व हुशार आणि सुस्वभावी असणाऱ्या ओमच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्यावर आज सायंकाळी राजूरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
![](http://yuvavarta.in/wp-content/uploads/2023/12/jankiram-kajale-982x1024.jpg)