कडेकोट बंदोबस्त, संगमनेरात मतमोजणीची तयारी पूर्ण

मतमोजणीनिमित्त मतमोजणी केंद्रात व परिसरात कडेकोट बंदोबस्त

कार्यकर्त्यांचा खडा पहारा
मतमोजणी केंद्रावर सुरक्षा रक्षक डोळ्यात तेल घालून पहारा देत असले तरी आतमध्ये जाऊन कुणीही काही गडबड, फेरफार करू नये यासाठी महायुती व महाआघाडी कार्यकर्त्यांनी देखील खडा पहारा दिला आहे. दरम्यान शुक्रवारी काही अज्ञात व्यक्तींनी या मतदान केंदात घुसण्याचा प्रयत्न केला. ही घटना कळताच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धाव घेतली. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी दोन्ही बाजूकडून अतिशय दक्ष राहून मत पेट्यांचे रक्षण केले जात आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार्‍या महत्वपुर्ण मतमोजणीनिमित्त मतमोजणी केंद्रात व परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही मतमोजणी पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येईल असे आश्‍वासन निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिले. 217 संगमनेर विधानसभा निवडणूक दिनांक 20-11-2024 रोजी एकुण 288 मतदान केंद्रावर शांततेत व सुरळीत पार पाडली. मतदान प्रक्रियांमध्ये कोणताही अनुचित प्रकार समोर आलेला नाही. 147 मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्यात आले, वेबकास्टींगमुळे मतदान केंद्रावर मतदानासाठी लागणार्‍या रांगा व मतदान केंद्रातील तसेच मतदान केंद्राबाहेरील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने उत्तम नियोजन करण्यात आले होते. 217 संगमनेर विधानसभेतील 288 मतदान केंद्रामध्ये एकूण 75.19% इतके मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक (जनरल) 217 संगमनेर विधासभा मतदार संघ यांचे उपस्थितीत 217 विधानसभा मतदारसंघातील केंदनिहाय दिनांक 21-11-2024 रोजी सकाळी 11.00 वाजता निवडणूक लढविणार्‍या उमेदवारासमवेत नमुना 17 अ बाबतची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. उपस्थित उमेदवार / निवडणुक प्रतिनिधी यापैकी कोणीही प्रक्रियेवर आक्षेप घेतला नाही.

This image has an empty alt attribute; its file name is job1.png

भारत निवडणूक आयोगाने 217 संगमनेर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व त्यावर नियंत्रण करणेकामी सुशील सिंह, निवडणूक निरीक्षक (मतमोजणी) यांची नेमणुक केलेली आहे. मतमोजणी प्रक्रियेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार 217 संगमनेर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता सुरुवात होईल. सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रिडासंकुल, संगमनेर येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी ईव्हीएम साठी 14 टेबल, पोस्टल बॅलेट साठी 9 टेबल व एढझइड साठी 5 टेबल असे एकूण 28 टेबल लावण्यात आले आहे. प्रत्येक टेबलवर 1 सुक्ष्म निरीक्षक, 1 पर्यवेक्षक व 1 सहाय्यक असे एकुण 95 अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष मोजणीसाठी टेबलसाठी नियुक्त केले आहे. सदर मतमोजणी प्रक्रियेत 21 फेर्‍या पार पडणार आहेत. मतमोजणी कामी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच मिडिया सेलची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार असून बंदोबस्तासाठी स्थानिक पोलीस व सीआरपीएफ मध्य प्रदेश) यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी केंद्रापासून 200 मीटरच्या आत अधिकृत व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच भारतीय दंड संहिता 163 अन्वये मतमोजणी केद्रापासून 100 मीटर च्या आत पादचारीत क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. शनिवारच्या या मतमोजणीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख