संगमनेरात श्रीराम नवमी उत्साहात; मंदिरांत भक्तांची गर्दी

0
6

राम मंदिरात भक्तांची मांदीयाळी

आज चैत्र शुद्ध नवमी… अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव! मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. शहरातील विविध राम मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. विविध संघटनांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

संगमनेर शहरात श्रीराम नवमीनिमित्त शहरातील चंद्रशेखर चौकातील राम मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रतिनिधी आ. अमोल खताळ व त्यांच्या पत्नी सौ. निलमताई खताळ यांच्या हस्ते विधिवत आरती करण्यात आली. यावेळी उद्योजक राजेश मालपाणी यांच्यासह विविध संस्थांचे, संघटनाचे, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविक उपस्थित होते. राम नवमी निमित्त मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती.

शहरातील नविन नगर रोड येथील जानकीनगरमधी श्रीराम मंदिरात राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, मालपाणी उद्योग समुहाचे संचालक मनिष मालपाणी, नगरसेविका सीमाताई खटाटे, नंदा गरूडकर, रचना मालपाणी, गणेश गुंजाळ यांच्यासह अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here