16 नोव्हेंबरला संध्याकाळी मालपाणी लॉन्स येथे “श्री” बॉडी बिल्डिंग स्पर्धा

संगमनेरच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रात उत्तमपणे कार्यरत असणाऱ्या ‘आय लव्ह संगमनेर’ च्या माध्यमातून आज दि. 16 नोव्हेंबर रोजी संगमनेर “श्री” चं म्हणजेच बॉडी बिल्डिंग (शरीरसौष्ठव) स्पर्धेचे आयोजन सायंकाळी ठीक 6.00 वाजता मालपाणी लॉन्स संगमनेर येथे करण्यात आले आहे. ही स्पर्धा शहरातील युवक-युवतींना फिटनेस, स्नायूंचा विकास आणि शरीरसौष्ठव प्रदर्शन करण्याची संधी देण्यासाठी आयोजित केली जात आहे.
या स्पर्धेत प्रामुख्याने पुरुष आणि महिला Classic, Physique व Fitness अशा विविध विभागांमध्ये सहभागी होणार आहे. अशी माहिती प्रकल्प प्रमुख नचिकेत खोले यांनी दिली. यावेळी बोलतांना खोले म्हणाले की, समाजातील युवकांनी खऱ्या अर्थानं नशा मुक्ती कडे गेलं पाहिजे. नशा मुक्ती साठी आपण ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करत आहोत जेणेकरून जे युवक आहेत त्यांनी नशेकडे न जाता आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्याची काळजी घेतली पाहिजे हेच माझं ध्येय आहे. तरुण चांगल्या मार्गाला लागतील.




















