ढोल ताशांच्या गजरात महावादनाने दुमदुमले संगमनेर

0
264

आय लव संगमनेर चळवळ संपन्नता वाढवणारी – आ. तांबे

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरातील राजकीय सुसंस्कृतपणा, आदर्शवत सहकार, शिक्षण, कृषी, ग्रामीण विकास यामधील काम याचबरोबर सांस्कृतिक विविधता ही जपण्याचे काम तरुणांचे असून आदर्श संगमनेर तालुक्याचा लौकिक संपूर्ण देशामध्ये वाढवा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आय लव संगमनेर लोक चळवळीने तालुक्याची संपन्नता वाढवण्यासाठी मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहे. 400 कलाकारांच्या उपस्थितीत झालेल्या ढोल ताशांच्या गजराने संगमनेर शहर दुमदुमून गेले.
संगमनेर बस स्थानक येथे आय लव संगमनेरच्या वतीने पारंपारिक वादकांचा महामेळावा व भव्य महावादन संपन्न झाले. यामध्ये तांडव, रुद्र, एकलव्य, छावा, हिंदू राजा, या ढोल पथकातील 400 कलाकारांनी सहभाग घेतला. यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आयोजक आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, गिरीश मालपाणी, दिलीपराव पुंड, डॉ. मैथिलीताई तांबे, नितीन अभंग यांच्यासह आय लव संगमनेर चळवळीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगमनेरच्या एकरुपतेचे प्रतीक – आ. तांबे

संगमनेरमध्ये देशात नावाजलेले ढोल ताशा पथक आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी अशा विविध राज्यांमध्ये ते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून वादन करत असतात. या सर्वांना एकत्र करून हा भव्य महावादन मेळावा होत आहे. हे सर्व संगमनेरकर एकरूप होऊन आज गणेश उत्सवानिमित्त गणेशाला महावंदन करत आहे. संगमनेरकर विविध जाती धर्माचे सर्व लोक एकत्र येऊन सर्वांचे सण आनंदाने साजरा करतात हे तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. आपल्या मातीतील कलाकारांचा गौरव होऊन संगमनेरचा गौरव देशात पोहोचवणारा हा महावादन सोहळा संस्मरणीय ठरणारा झाला असल्याचे आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.


गणेश उत्सवानिमित्त संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये आय लव संगमनेरच्या वतीने भव्य विद्युत रोषणाई मध्ये हा महामेळा संपन्न झाला. यावेळी पारंपारिक ढोल ताशांचा देशभर गजर करणारे 400 युवक व युवतींनी व इतर दोनशे कलाकारांनी सहभाग घेतला. मराठी व हिंदी गीतांच्या विविध चालींवर ढोल ताशांच्या गरजेने संगमनेर शहर दुमदुमले. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई. प्रेक्षक गॅलरी, मराठी वाद्य आणि धार्मिक वातावरण याचबरोबर गणेशाचा जय जय कार यामुळे सर्व वातावरण भक्तीमय झाले होते.
याप्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्याला विकासाची मोठी परंपरा आहे. सर्वधर्मसमभाव, बंधुभाव असलेले हे आदर्श व सुंदर शांततामय वातावरण असलेले शहर आहे. हा लौकिक आपल्या सर्वांना जपायचं आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संगमनेरचे मोठे नाव असून आय लव संगमनेर चळवळीच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठे व्यासपीठ आमदार सत्यजित तांबे यांनी उपलब्ध करून दिले आहे. तरुणांचा मोठा सहभाग आणि धार्मिक वातावरण हा प्रसन्न सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. ही एकरूपता आणि संघटन चांगले असून त्याचा वापर तालुक्याच्या आणि देशासाठी व्हावी. संगमनेर शहराचा व तालुक्याचा आदर्श तालुका म्हणून तरुणांनी यापुढील काळातही देशभरात लौकिक वाढवावा असे आवाहन करताना सर्वांनी शांततेने व मोठ्या भक्ती भावाने आनंदाने गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले कि, संगमनेरचे गुणी कलावंत देशभरामध्ये विविध ठिकाणी आपली कला साजरी करतात. ढोल ताशा पथकातील या सर्व कलाकारांना एकत्र घेऊन आजचा हा महावादन सोहळा होत आहे. पारंपारिक वाद्यांचा हा सोहळा संस्मरणीय असून यामध्ये युवक व युवतींचा मोठा सहभाग आहे. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सर्वांचे सन साजरी करतात एकरूपता ही संगमनेर तालुक्याचे वैशिष्ट्य असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, संगमनेरची एक समृद्ध परंपरा आहे. सांस्कृतिक वैभव लागलेल्या संगमनेरच्या या भूमीने देशाला दिशा दिली असून गणेश उत्सवाचा आनंद घेताना सर्वांनी बंधुभाव अधिक वाढीस लावावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गिरीश मालपाणी, डॉ. जयश्रीताई थोरात यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संगमनेर तालुक्यातील हजारो तरुणांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. पावसाच्या हलक्या सरी, डिजेचा दणदणाट, डोळे दिपवणारी आकर्षक रोषणाई यामुळे हा संपुर्ण परिसर जल्लोषाने भारावून गेला होता. पोलिसांनी ही यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here