संगमनेर नगरपरिषदेची नवी प्रभागरचना जाहीर

१५ प्रभागांमधून ३० नगरसेवकांची निवड
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 16 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जाती महिला, 34 नगरपरिषद ओबीसी महिलांसाठी तर 67 नगरपरिषद नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. संगमनेर नगरपरिषद देखील महिला खुला प्रवर्गासाठी राखीव झाली आहे. या आरक्षण सोडतीमुळे अनेकांचे स्वप्न भंगले असून महिलांमध्येच आता ही लढाई रंगणार आहे.

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम 1965 अन्वये संगमनेर नगरपरिषदेची अंतिम प्रभागरचना अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्यात आलेल्या या नव्या रचनेनुसार संगमनेर नगरपरिषद क्षेत्रात एकूण 15 प्रभाग निश्चित करण्यात आले असून प्रत्येक प्रभाग हा दोन सदस्यीय आहे. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 30 नगरसेवकांची निवड होणार आहे.
ही अधिसूचना 18 ऑगस्ट 2025 रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध झाली असून, ही रचना आगामी नगरपरिषद निवडणुकीस लागू होणार आहे. प्रत्येक प्रभागाच्या लोकसंख्येचा, अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाचा तसेच भौगोलिक सीमांचा तपशील शासनाने प्रसिद्ध केलेल्या अनुसूचीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक 1 लोकसंख्या: 4136 (अनु.जा. 298, अनु.ज. 86)समाविष्ट परिसर: श्रमिक नगर, गोविंद नगर, गणेश नगर, जनता नगर. सीमा विवरण: उत्तर: पुणे-नाशिक हायवे व अकोले बायपास संगम (स.क्र.125) ते दक्षिण: स्वयंवर मंगल कार्यालय कॉनरपर्यंत.
प्रभाग क्रमांक 2 लोकसंख्या: 3968 (अनु.जा. 399, अनु.ज. 60) समाविष्ट परिसर: ऑरेंज कॉर्नर, कुंथुनाथ सोसायटी, सुयोग सोसायटी, रामनगर, साई विहार, सिद्धिविनायक सोसायटी. सीमा विवरण: उत्तर: 132 के.व्ही. कॉर्नर ते साईबाबा चौक, दक्षिण: जयहिंद चौक ते दिवटे किराणा, मालदाड रोड.
प्रभाग क्रमांक 3 लोकसंख्या: 4117 (अनु.जा. 264, अनु.ज. 133) समाविष्ट परिसर: परीहार कॉलनी, आनंदनगर, स्वामी समर्थ नगर, मधुबन कॉलनी, पारिजात कॉलनी, भारतनगर, माऊली कृपा कॉलनी. सीमा विवरण: उत्तर: साईबाबा चौक ते तिरंगा चौक, दक्षिण: घोलप हॉस्पिटल, मालदाड रोड, पश्चिम: साईनाथ चौक.

प्रभाग क्रमांक 4 लोकसंख्या: 4539 (अनु.जा. 339, अनु.ज. 41) समाविष्ट परिसर: शिवाजीनगर, रघे गार्डन परिसर, मेहरे मळा, जनता राजा मैदान परिसर, विद्यानगर, सौभाग्य मंगल कार्यालय परिसर. सीमा विवरण: उत्तर: दिवटे किराणा ते जयहिंद सर्कल, दक्षिण: जुनी स्टेट बँक ते सरस्वती हॉटेल, पश्चिम: नाशिक-पुणे हायवे.
प्रभाग क्रमांक 5 लोकसंख्या: 4169 (अनु.जा. 186, अनु.ज. 96)समाविष्ट परिसर: जनतानगर, चैतन्यनगर, मार्केटयार्ड परिसर. सीमा विवरण: उत्तर: वयंवर मंगल कार्यालय ते तुषार ट्रेड, दक्षिण: राजयोग वीट्स, अकोले बायपास ते नाशिक-पुणे हायवे.
प्रभाग क्रमांक 6 लोकसंख्या: 4124 (अनु.जा. 381, अनु.ज. 158) समाविष्ट परिसर: इंदिरानगर, स.बा. विद्यालय, स.बा.ं शासकीय विश्रामगृह परिसर. सीमा विवरण: उत्तर: राजयोग वीट्स ते जय जवान चौक, दक्षिण: पीडीयूडी गेटहाऊस ते पटेट कॉलेज सर्कल.

प्रभाग क्रमांक 7 लोकसंख्या: 4720 (अनु.जा. 312, अनु.ज. 253) समाविष्ट परिसर: देवाचा मळा, सावता माळी नगर, एस.टी. स्टँड, पंजाबी कॉलनी, विकल कॉलनी, माळीवाडा, संजय गांधी नगर, अभंग मळा. सीमा विवरण: उत्तर: मेडिकेअर हॉस्पिटल ते अकोले बायपास, दक्षिण: तहसील कार्यालय, मोमीनपुरा चौक ते राजापूर रोड.
प्रभाग क्रमांक 8 लोकसंख्या: 4433 (अनु.जा. 172, अनु.ज. 126) समाविष्ट परिसर: अभिनव नगर, एम.एस.ई.बी. कार्यालय, निवन नगर रोड, लिंक रोड, ताजणे मळा, नवघर गल्ली, अरगडे गल्ली. सीमा विवरण: उत्तर: जुनी स्टेट बँक रोड ते गुलाब गार्डन, दक्षिण: अशोक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा.
प्रभाग क्रमांक 9 लोकसंख्या: 4299 (अनु.जा. 108, अनु.ज. 9) समाविष्ट परिसर: कुरण रोड, गुंजाळ आखाडा, पानसरे आखाडा, जुना बैलबाजार, ज्ञानमाता विद्यालय, गुंजाळ नगर, पाबळे वस्ती, जांबार मळा. सीमा विवरण: उत्तर: पावबाक रोड ते कोहवेवाडी रोड, दक्षिण: नाटक नाला, अल्का हॉटेल, भूमी अभिलेख कार्यालय परिसर.

प्रभाग क्रमांक 10 लोकसंख्या: 4128 (अनु.जा. 57, अनु.ज. 0) समाविष्ट परिसर: भारतनगर, रेहमतनगर, जम-जम कॉलनी, अलकानगर, मौलाना आझाद मंगल कार्यालय, गलांडे मळा. सीमा विवरण: उत्तर: तीनबत्ती चौक ते वरा ऑटोमोबाईल्स, दक्षिण: जोव नाका ते नाशिक-पुणे हायवे.
प्रभाग क्रमांक 11 लोकसंख्या: 4568 (अनु.जा. 176, अनु.ज. 0) समाविष्ट परिसर: गवंडीपुरा किल्ला, सैयद बाबा चौक, देवी गल्ली, उपासनी गल्ली, तेलीखुंट, लक्ष्मीपुरा, घासबाजार. सीमा विवरण: उत्तर: गवंडीपुरा मशीद ते तीनबत्ती चौक, दक्षिण: जोव नाका ते मोठा मातृमंदिर परिसर.
प्रभाग क्रमांक 12 लोकसंख्या: 4549 (अनु.जा. 207, अनु.ज. 39) समाविष्ट परिसर: गांधी चौक, खंडोबा मंदिर, अशोक चौक, बाजार पठार, साईनाथ चौक, वडगळी, भागवत वाडा, कुंभार आळा, सैयद बाबा चौक. सीमा विवरण: उत्तर: मोमीनपुरा चौक ते गवंडीपुरा मशीद, दक्षिण: नेहरू चौक ते महात्मा फुले पुतळा.

प्रभाग क्रमांक 13 लोकसंख्या: 4904 (अनु.जा. 555, अनु.ज. 51) समाविष्ट परिसर: घोडेकर मळा, साईनगर, पिंपिंग स्टेशन, चव्हाणपुरा, जेधे कॉलनी, पनुवसन कॉलनी, स्वामी समर्थ मंदिर, साळीवाडा. सीमा विवरण: उत्तर: राजापूर रोड ते वरा नदी संगम, दक्षिण: माधव टॉकीज समोर ते स्वामी समर्थ मंदिर कॉर्नर.
प्रभाग क्रमांक 14 लोकसंख्या: 4753 (अनु.जा. 22, अनु.ज. 12) समाविष्ट परिसर: रंगार गल्ली, जेपी रोड, चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, वाडेकर गल्ली, परदेशपुरा, अँजेलो इंग्लिश स्कूल, नायकवाडपुरा मशीद परिसर. सीमा विवरण: उत्तर: शिंदे फोटो स्टुडिओ ते नेहरू चौक, दक्षिण: पुणे-नाशिक हायवे व प्रवरा नदी पूल.
प्रभाग क्रमांक 15 लोकसंख्या: 4397 (अनु.जा. 2, अनु.ज. 0) समाविष्ट परिसर: बी टॉवर, नायकवाडपुरा, डाके मळा, जोर्वे रोड, यंग नॅशनल स्पोर्ट्स ग्राऊंड, पुणे नाका, रहमतनगर, फादरवाडी. सीमा विवरण: उत्तर: देवी गल्ली ते जोर्वे नाका, दक्षिण: प्रवरा नदीचा दक्षिण किनारा, पश्चिम: अमरधाम प्रवेशद्वार परिसर.

या प्रभागरचनेनुसार संगमनेर नगरपरिषदेतील विकासकामांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. नव्या प्रभागांनुसार आरक्षण व मतदारसंख्या निश्चित होणार असून, आगामी निवडणुकीत शहरातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेतील. नगरपरिषदेच्या कार्यालयीन वेळेत प्रभागांची नकाशे पाहण्यासाठी उपलब्ध राहतील.