पालिकेच्या प्रभाग रचनेवर ३३ हरकती

0
264

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. यावर हरकती घेण्याचा रविवारी (दि. 31) शेवटचा दिवस असल्याने प्रभाग रचनेवर एकूण 33 हरकती आल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.
गेल्या तीन वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुका रखडल्याने नागरिकांची उत्सुक्ता लागली होती. या निवडणुका कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले असतानाच अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर दि. 18 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने प्रभाग रचना जाहीर केली. ही प्रभाग रचना जाहीर होताच इच्छुक उमेदवार व नागरिकांनी समाधान व्यक्त करण्यात आले. ही प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुकांनी नगरपालिकेत जाऊन प्रभाग रचनेची माहिती घेतली.
प्रभाग रचनेनुसार संगमनेर नगरपालिकेत 15 प्रभाग असणार असून प्रत्येक प्रभागात दोन, अशाप्रमाणे एक महिला व एक पुरुष असे 30 नगरसेवक असणार आहे. या प्रभाग रचनेवर हरकत घेण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. काल रविवारी 31 ऑगस्ट रोजी हरकती घेण्याचा अखेरचा दिवस होता. या प्रभाग रचनेवर एकूण 33 हरकती घेण्यात आल्या आहे. यात काही प्रभागांवर तर संपूर्ण शहरातील प्रभात रचनेवरच आक्षेप नोंदविण्यात आल्याची प्राथमिक माहिती रामदास कोकरे यांनी दिली.
आलेल्या सर्वच 33 हरकतींची सोमवारी (दि.1 सप्टेंबर) रोजी छाननी होणार आहे. या छाननीनंतर कोणत्या प्रभागात किती हरकती आल्या हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान नगरपालिकाचे अधिकारी या प्रभाग रचनेच्या कामा बाबत उदासीन दिसून आले. शनिवारी सुट्टी असल्याने कार्यालयात हरकती घेण्यात अडचणी निर्माण झाल्या. तर रविवारी देखील तीन वाजेपर्यंत मुदत असतानाच अडीच वाजताच अधिकारी कर्मचारी गायब झाले होते. याबाबत संबंधित अधिकारी प्रल्हाद देवरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया न देता सोमवारी माहिती देण्यात येईल, आता माहिती देऊ शकत नाही असे उत्तर दिले. एकूणच प्रभाग रचना निवडणुकीचे कामकाजाबाबत नगरपालिकेचे मुख्याधकारी देविदास कोकरे यांचे नियंत्रण नसल्याने अधिकारी कर्मचारी कुणाला दात देत नसल्याचे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here