संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत ट्विस्ट

0
366

संगमनेरच्या तीन प्रभागातील निवडणुकीला स्थगिती ?

नगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचून मतदानाला अवघे २ दिवस शिल्लक असताना मोठी घडोमोड समोर आली आहे. राज्यातील २४६ नगरपालिकेंच्या निवडणुकीतील आरक्षण व आक्षेप यामुळे अनेक नगरपालिका व नगरपंचायतीतील नगराध्यक्षपद व काही ठिकाणांवरील नगरसेवक पदाला निवडणुक आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यात संगमनेर नगरपरिषदेचा देखील समावेश आहे.

महाराष्ट्रातील  246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.  2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या दिवशीच म्हणजे 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.  4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अशातच  राज्यात ज्या ज्या ठिकाणी नगरपरिषदाच्या अध्यक्षपदावरून आक्षेप आहे त्या ठिकाणी सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यासह हिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. नगरपंचायतींमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. कोपरगाव, देवळाली, नेवासा व पाथर्डी या चार ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपील असल्याने नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली आहे.  याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात आपली असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया देखील पुढे ढकलणार. पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 10 डिसेंबर पर्यंत माघार घेण्यासाठी मुदत तर 20 डिसेंबर मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती आहे. 

पुण्याच्या बारामती नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी दोन डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया तात्पूर्ती स्थगित करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदा सह नगरसेवक पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून नवीन कार्यक्रमानुसार बारामती नगरपरिषदेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. 

बारामती नगरपरिषदेच्या विरोधात उमेदवारांच्या संदर्भात न्यायालयाचा अपील दाखल झाले होते, याशिवाय प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक 13 (ब) व प्रभाग क्रमांक 17 (अ) या दोन प्रभागांतील निवडणुका अगोदरच तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर या दोन जागांसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार 26 नोव्हेंबर रोजी नव्याने दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. भाजपचे नेते सतीश फाळके व अविनाश गायकवाड यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर बारामती न्यायालयाने या दोघांचेही उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते.

एकंदरीतच या दोन जागा याशिवाय इतर जागा संदर्भात न्यायालयात दाखल झालेले अपील याचा विचार करता केलेल्या अपिलाची मुदत संपल्यानंतर निवडणुक कार्यक्रम लागणे आवश्यक आहे असं निवडणूक आयोगाचे म्हणणं आहे आणि त्यानुसार 2 डिसेंबर रोजी होणारी बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची ही निवडणूक प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे आणि नवीन अध्यादेशानुसार ही मतदान प्रक्रिया आता 20 डिसेंबर रोजी होणार आहेत.

४ डिसेंबरः जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.
१० डिसेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत): नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम मुदत.
११ डिसेंबरः चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर.
२० डिसेंबरः मतदान.
२१ डिसेंबर २०२५: मतमोजणी.
२३ डिसेंबरपूर्वीः संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here