‘बुढ्ढी के बाल’मध्ये वापरला रंगपंचमीचा रंग

मुलांच्या आरोग्याशी खेळ, विक्रेता पोलीसांच्या ताब्यात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
लहान मुलांना आवडणार्‍या बुढ्ढी के बाल या खाद्यपदार्थात चक्क खाण्याच्या रंगाऐवजी रंगपंचमीचा रंग वापरून मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला. अशा या परप्रांतीय विक्रेत्याला रंगेहाथ पकडून जागृत नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार शहरातील घास बाजार येथे काल मंगळवारी उघडकीस आला.
या बाबत माहिती अशी की, शहरातील सय्यद बाबा चौक, घास बाजार, देवी गल्ली, नाईकवाड पुरा यासह इतर भागात एक परप्रांतीय विक्रेता बुढ्ढी के बाल विकत आहे. मात्र यात हा विक्रेता खाण्यासाठीचा रंग वापरण्याऐवजी चक्क रंगपंचमीचा रंग वापरत होता. याबाबत परिसरातील काही नागरिकांना शंका होती. त्यांनी एक दोन वेळेस या विक्रेत्याला अडवले होते. परंतु तो ते मान्य करत नव्हता. दरम्यान काल दुपारी हा विक्रेता घासबाजार येथे आला असता स्वराज्य संघटनेचे शहर प्रमुख निलेश पवार, उपशहर प्रमुख विनोद कोकणे, युवा नेते निखिल पापडेजासह काही तरुणाने या विक्रेत्याला पकडले व त्याच्याकडील साहित्याची तपासणी केली असता त्यात चक्क रंगपंचमीचा रंग वापरत असल्याचे आढळून आले. उपस्थित नागरीकांची खात्री झाल्यावर याबाबत शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत या विक्रेत्याला ताब्यात घेतले. सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा हा विक्रेता नंतर कबूल झाला.


दरम्यान सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त अन्नपदार्थ विकले जात आहे. कालच अन्न व औषध प्रशासनानाचे एक पथक शहरात आले होते. त्यांनी तक्रारी नंतर अनेक व्यापार्‍यांच्या तेल, मालाचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्याचा अहवाल येईल तेव्हा येईल परंतु लहान मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये अशा प्रकारे भेसळ होत असेल तर तो त्यांच्या जीवाशी खेळ करण्यासारखा आहे. त्यामुळे अशा भेसळखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरीकांनी केली आह

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख