अध्यक्षपदी डॉ.संगिता रसाळ तर सेक्रेटरीपदी डॉ. विशाखा पाचोरे
संगमनेर युवावार्ता (प्रतिनिधी)- निमा वुमेन्स फोरम, संगमनेर या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात मावळत्या अध्यक्षा डॉ. शुभदा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निमा भवन येथे पार पडली. डॉ.सुभाष कोल्हे व डॉ. प्रदीप शहा यांनी निवडणूक अधिकारी म्हणून मार्गदर्शन केले. या नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षा म्हणून डॉ. संगिता रसाळ यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षा म्हणून डॉ. वैशाली कुलकर्णी व डॉ. पूनम कचेरिया यांची निवड झाली. तसेच खजिनदार हणून डॉ. किरण चांडक, सेक्रेटरी म्हणून डॉ. विशाखा पाचोरे यांची निवड करण्यात आली.
जॉइंट सेक्रेटरीपदी डॉ. सुप्रिया गायकवाड व डॉ. रुपाली ताम्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली. असिस्टंट सेक्रेटरी डॉ फरिदा मिर्झा, रुपाली जोंधळे यांची निवड झाली. तल कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. शुभदा देशमुख, डॉ. माधवी गणोरे, डॉ.सुचिता उंबरदड, डॉ. भारती गुंजाळ, रोहिणी करंजेकर, डॉ. रेखा मतकर, डॉ. प्रियंका खैरनार, डॉ.स्मिता देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ.स्वाती सोमण, डॉ.शुभदा भुजबळ, नूतन अध्यक्षा डॉ. रसाळ मॅडम यांनी सुत्रसंचलन व मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित सचिव डॉ. विशाखा पाचोरे यांनी सर्वाचे आभार मानले. नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
निमा वुमेन्स फोरमच्या माध्यमातून रक्दान शिबीर, एच.बी. चेकअप, विविध शारिरिक तपासण्या, कॅन्सर डिटेक्शन कॅम्प, सर्वरोग निदान शिबीर, नेत्ररोगासंबंधी उपचार आदी उपक्रम राबविले जातात. एक्स्पर्ट डॉक्टरांचे व्याख्यानही आयोजित केले जातात.