लालतारा परिसरात कचरा, मेलेल्या जनावरांचे कातडे आणि दुर्गंधीचा त्रास वाढतोय

संगमनेर (प्रतिनिधी): संगमनेर शहरातील लालतारा परिसरातील नागरिकांनी परिसरात वाढत्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यां, मेलेल्या जनावरांच्या कातड्यां, आणि घाणीतून (लालतारा परिसर कचरा संगमनेर)निर्माण होणाऱ्या दुर्गंधी व आजारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

(लालतारा परिसर कचरा संगमनेर)- नागरिकांनी सांगितले की, “प्रशासनाकडे वेळोवेळी सांगूनही आमच्या लालतारा परिसरात गावातील संपूर्ण कचरा, जनावरांची कातडी, इतर घाण टाकली जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, डासांची संख्या, आणि विविध आजार पसरत आहेत. आमचं आरोग्य धोक्यात आलं आहे.” लालतारा परिसरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे स्थानिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.