अकोल्यात कळसुआई महोत्सव होणार उत्साहात साजरा

0
111

युवावार्ता (प्रतिनिधी)
अकोले – अकोले तालुक्याच्या विकासासाठी सतत कार्यरत असलेल्या आमदार डॉ. किरणजी लहामटे यांच्या संकल्पनेतून ‘कळसुआई महोत्सवाचे’ चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अकोले आणि महिला व बालविकास विभाग, पंचायत समिती, अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य महोत्सव संपन्न होणार आहे.
या महोत्सवात महिला बचतगटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ व विविध वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे असणार आहे. रविवार, 23 मार्च 2025 सकाळी 10:00 वा. बाजारतळ, अकोले शहर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर येथे महिला मार्गदर्शन मेळावा

– मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, आमदार डॉ. किरणजी लहामटे, अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम गायकर, पद्मश्री पुरस्कार विजेत्या बीजमाता राहिबाई पोपेरे तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम अध्यक्ष – सौ. ममताताई भांगरे (बीजमाता) तसेच, प्रशासनातील अधिकारी, पंचायत समिती व महिला बचतगटांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल या निमित्ताने पडणार आहे. या महोत्सवामुळे महिला बचतगटांना व्यासपीठ मिळणार असून, त्यांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहेत. महिला सशक्तीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सर्व नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहून महिलांच्या उद्योगाला प्रोत्साहन द्यावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here