राजपाल उद्योग समूहाचे प्रमुख जोगिंदरलाल राजपाल यांचे निधन

0
164

आठवडे बाजारातून उभा राहिलेला उद्योगआज संपूर्ण जिल्ह्यात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेरसह अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात कापड व्यावसायातील अग्रेसर असणार्‍या राजपाल उद्योग समुहाचे संस्थापक संचालक तसेच पवन राजपाल, मुकेश राजपाल आणि बंटी राजपाल यांचे मोठे भाऊ आणि सोनु राजपाल व हितेश राजपाल यांचे वडील जोगिंदरलाल हंसराज राजपाल यांचे आज सोमवार ता.19 जानेवारी रोजी निधन झाले. मृत्यू समयी ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजपाल परिवारावावर शोककळा पसरली आहे.


स्व. जोगिंदरलाल राजपाल यांचे वडील अनेक वर्षांपुर्वी संगमनेर शहरात व्यवसायानिमित्त स्थायिक झाले. पुढे स्व. जोगिंदरलाल राजपाल यांनी आठवडे बाजार करून कपडे विकण्याचे काम केले. हळूहळू व्यवसायात जम बसवला व पुढे संगमनेर शहरात राजपाल क्लॉथ (कापड) हे ब्रॅण्ड तयार झाले. आज केवळ संगमनेरातच नव्हे तर अहिल्या नगर, नारायणगाव, श्रीरामपूर या मोठ्या शहरांमध्ये राजपाल क्लॉथच्या शाखा आहेत. अतिशय मेहनतीने राजपाल परिवाराने हा व्यवसाय वाढवला. या व्यवसायाचे आधारस्तंभ असणारे जोगिंदरलाल राजपाल हरवल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. कै. जोगिंदरलाल राजपाल यांच्यावर बुधवारी सकाळी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने कै. जोगिंदरलाल राजपाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here