जनार्दन आहेर शिवसेनेतून निलंबित

अनेक दिवसांपासून पक्षाच्या राजकारणापासून जनार्दन आहेर लांब

संगमनेर (प्रतिनिधी) – घारगाव येथील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य यांचे पक्षातून निलंबित केल्याचे पत्रक उत्तर नगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी काढले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या राजकारणापासून जनार्दन आहेर लांब आहेत. शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या वेळेपासून ते पक्षात सक्रीय नसल्याने त्यांच्यावर ही निलबंनाची कारवाई करण्यात आली असल्याचे रावसाहेब खेवरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

पठार भागामध्ये जनार्दन आहेर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रचंड जनसंपर्क आणि सुखदु:खात सहभागी होणारे जनार्दन आहेर यांनी संगमनेर विधानसभा निवडणुक देखील लढवली होती. गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांमुळे ते राजकारणात सक्रीय नव्हते. मात्र अशा कोणत्याही कारणाचा पत्रकात उल्लेख नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. राजकारणात सक्रीय नसले तरी ज्या कारणामुळे ते सक्रीय नाहीत याचे कारण पक्षाने जाणून घेतले आहे का असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे.
हा निर्णय पक्षाने का घेतला? हा निर्णय घेताना जनार्दन आहेर यांच्याबरोबर चर्चा झाली का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख