राहता मतदारसंघांमध्ये मोठी दहशत आहे, इथे विकास थांबलेला आहे – आमदार थोरात
युवावार्ता (प्रतिनिधी)
शिर्डी /संगमनेर – भाजप व महायुती सरकारने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांची नाव घेण्याची पात्रता यांची नाही. महाराष्ट्रात तोडून फोडून आलेले सरकार हे जनतेला मान्य नाही. महाराष्ट्रातील युवक बेरोजगार करून अनेक उद्योग या सरकारने गुजरातला पळवले असून देशात व राज्यात महागाईचा दहशतवाद वाढले असल्याची टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली असून खोट्या बोलणार्या महायुती सरकारला हद्दपार करा असे आवाहन जनतेला केले आहे. शिर्डी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सौ प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, उमेदवार हेमंत ओगले, कोपरगाव चे उमेदवार संदीप वर्पे, नानासाहेब कारले, बाळासाहेब गायकवाड, पैलवान रावसाहेब खेवरे, रणजितसिंह देशमुख, डॉ जयश्रीताई थोरात, मिलिंद कानवडे, सुहास वाहढणे, सहप्रभारी बीएम संदीप ,आमदार रिटा चौधरी, तेलंगणाच्या मंत्री सीताक्का, सचिन गुजर, करण ससाने आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, महाराष्ट्र ही संतांची आणि शिवरायांची भूमी आहे. मात्र शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान मोदी व भाजप सरकारने केला आहे. त्यांना महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे या भूमि मधील आहे. मोदी यांनी दिलेले आव्हान मी स्वीकारते आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेते. आता माझे चॅलेंज आहे की मोदी व भाजप सरकारने जातीनिहाय जनगणना करावी. महाराष्ट्रात तोडून फोडून सरकार आले. संविधान धोक्यात आले आहे. येथील अनेक उद्योग गुजरातला नेले आहे. महिला सुरक्षित नाहीत. अशा सतत खोटे बोलणार्या सरकारला जनतेने खाली खेचले पाहिजे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये व राज्यात मोफत एसटी प्रवास मिळणार आहे तसेच शेतकर्यांना 3 लाखापर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. आणि याचबरोबर 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव कांदा कापूस या सर्व पिकांना हमीभाव दिला जाणार आहे. काँग्रेस बोलते ते करते. भाजप सरकार सातत्याने खोटे बोलते.
शिर्डी मतदारसंघातही मोठा दहशतवाद आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून येथील दहशतवाद संपवा असे आवाहन त्यांनी केले.
तर आ. थोरात म्हणाले की, राहता मतदारसंघांमध्ये मोठी दहशत आहे. इथे विकास थांबलेला आहे. माझी खुली आव्हान आहे की चर्चा समोरासमोर होऊन जाऊ द्या. सौ. घोगरे म्हणाल्या की, शेतकर्याची मुलगी असल्याने या दहशती विरुद्ध आवाज उठवला आहे. आणि यामध्ये प्रियंका गांधींसह सर्व तालुका एकवटला आहे शिर्डीमध्ये परिवर्तन नक्की असून सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन केले. यावेळी खा. भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. जयश्रीताई थोरात, संदीप वर्पे, हेमंत ओगले, सचिन गुजर, करण ससाने, धनंजय गाडेकर, लताताई डांगे यांनी मनोगती व्यक्त केली. यावेळी शिर्डीसह कोपरगाव, संगमनेर मधील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व राहता मतदार संघातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.