स्वाद, सेवा आणि आत्मीयतेचा संगम — ‘हॉटेल नेचर’चे वैशिष्ट्य

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील वडगाव पान शिवारातील हॉटेल नेचर रिसॉर्टच्या यशस्वी वाटचालीनंतर आता ‘हॉटेल नेचर’ची दुसरी शाखा पुणे-नाशिक महामार्गावरील खंदरमाळ (ता. संगमनेर) येथे सुरू करण्यात आली आहे. शनिवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या शाखेचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले.

स्वादिष्ट भोजन, विनम्र सेवा आणि ग्राहकांप्रती असलेला आत्मीय भाव यामुळे संचालक विजय थोरात हे हॉटेल व्यवसायातील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात. या नवीन शाखेचे उद्घाटन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष व मॅनेजिंग ट्रस्टी अशोक दुधाडे आणि आ. अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरुण इथापे होते. या प्रसंगी हॉटेलचे संचालक विजय थोरात, त्यांचे आई-वडील गणपत थोरात व कमल थोरात, तसेच थोरात परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्यास सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे डेप्युटी सेक्रेटरी अमोल कासार, नगर विभागाचे रिजन हेड डॉ. सागर हासे, डेप्युटी रिजन हेड डॉ. सागर गोपाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे, सेवानिवृत्त आरटीओ अनिल आहेर, खंदरमाळ ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश लेंडे, तसेच सॅटर्डे ग्रुपचे जनरल सेक्रेटरी सुहास फडणीस आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या मनोगतात डॉ. अरुण इथापे, अजय फटांगरे, गणेश लेंडे आणि अनिल आहेर यांनी ‘हॉटेल नेचर’च्या उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

अशोक दुधाडे व आ. अमोल खताळ यांनीही हॉटेलच्या संकल्पनेचे कौतुक करताना, गुणवत्तापूर्ण आणि कौटुंबिक वातावरणात सेवा देणारे हे हॉटेल प्रवाशांसाठी उत्तम ठिकाण ठरेल, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला संगमनेर, घारगाव, सिन्नर, नाशिक आणि अहिल्यानगर येथील सॅटर्डे क्लबचे पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हॉटेल नेचर फॅमिली रेस्टॉरंटचे संचालक विजय थोरात यांच्यासोबत हिरकणी ग्रुपच्या अध्यक्षा लतिका थोरात, तसेच प्रणव विजय थोरात, आलोक विजय थोरात आणि थोरात परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.
समारंभानंतर उपस्थित पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. ‘हॉटेल नेचर’च्या या नव्या शाखेमुळे खंदरमाळ परिसरात प्रवाशांना स्वच्छ, सुंदर आणि कौटुंबिक वातावरणात स्वादिष्ट भोजनाची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहे.