शिवपुराण कथेत लुटमार करणाऱ्या महिलांच्या टोळ्या जेरबंद

0
139

भाविकांच्या सुरक्षेसाठी शिर्डी पोलिसांची सतर्क मोहीम

23 महिला, 3 पुरुष पोलिसांच्या ताब्यात

आरोपींकडे पुढील दोन वर्षांच्या चोरीचे नियोजन

युवावार्ता (प्रतिनिधी)
शिर्डी – पंडीत प्रदिप मिश्रा यांची दिनांक 12/10/2025 रोजी ते दि. 16/10/2025 या कालावधीत शिव महापुराण कथा निर्मळ पिंप्री ता. राहाता येथे आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यक्रमासाठी देशभरातुन लाखो महिला व पुरुष भाविक सहभागी झालेले होते. या पुर्वीच्या कथेदरम्यान भाविकांचे मौल्यवान वस्तु चोरीस जातात अशी माहिती मिळाली असल्याने सदर ठिकाणी सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे आदेशान्वये व सोमनाथ वाघचौरे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग, जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी, राहाता, लोणी या ठिकाणी पायी पेट्रोलिंग, हॉटेल लॉजेस चेंकींग, संशयित गुन्हेगारांवर पाळत तसेच नाकाबंदी करुन सदर कार्यक्रम ठिकाणी चोरी, दरोडा या सारखे तसेच दुखापती सारखे गुन्हयास प्रतिबंध होणेकरीता व शिव महापुराण कथा सुरळीत पार पाडण्याकरीता विविध पथके तयार करून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


शिव महापुराण कथा अनुषंगाने दि.11/10/2025 रोजी शिर्डी येथे पंडीत प्रदिप मिश्रा यांची मिरवणुक काढण्यात आलेली होती. सदर मिरवणुकीत अनेक महिला व पुरुष भाविक सहभागी झालेले होते. या मिरवणुकीत सांयकाळी गर्दीचा फायदा घेवुन भाविक महिला व पुरुषांचे अंगावरील दागिने व मौल्यवान वस्तु यांची संगनमताने घातक शस्त्रासह चोरी करुन दरोडा घालण्याचे पुर्वतयारीत असलेल्या शिल्पा पप्पु कुमार, रा. जुसी ता. जुसी जि. अलाहाबाद, उत्तर प्रदेश, पुनम राजेश कुमार, रा. चितनपुर जि. वाराणसी, उत्तर प्रदेश, अंजली संदिप कुमार रा. जुकीया जि. भराईच, उत्तर प्रदेश, पुजा हनुमान कुमार, रा. मुगलसराय जि. चांडोली, उत्तर प्रदेश, दुलारी घुरण कुमार, रा. जुसी रेल्वे स्टेशन जि. अलाहाबाद, उत्तर प्रदेश, उन्नी सुरेशचंद्र पवार, रा. पुरणनगर ता. कोटपुरी जि. जयपुर, राजस्थान अशा 6 महिला आरोपी साईबाबा मंदिर परीसरात गेट नं. 4 येथे पकडण्यात आल्या. कटर व ब्लेड अशी घातक शस्त्रासह त्या मिळुन आल्याने त्यांच्यावर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे.
दि.12/10/2025 रोजी निर्मळ पिंप्री ते लोणी जाणारे रस्त्याचे कडेला सांयकाळी सुमारास गर्दीचा फायदा घेवुन भाविक महिला व पुरुषांना संगनमताने घातक शस्त्रासह चोरी करुन दरोडा घालण्याचे पुर्वतयारीत असलेल्या शिंदु विरु राखडे, देवकाबाई मनिष हातांगळे, छाया गोविंद हातांगळे, भारती कालीन नाडे, पुजा पंकज लोंढे, नंदिनी गुलशन राखडे, उज्वला शिवा सकट, वर्षा निलेश खंडारे रा. अशोकनगर जि. वर्धा, दुर्गा संजय राखपसरे, नंदा संजय सकट, रा. गंगानगर ता. नेवासा, सागर रमेश डोंगरे, वर्धा, नितीन जगदिश समुद्रे, रा. मस्जिद चौक, वर्धा, सचिन कुमार सुखदेव महोतो, रा. झारखंड अशा 10 महिला व 03 पुरुषांना पकडण्यात आले. त्यांचेकडे चाकु, कटर, ब्लेड व मारुती डिझायर गाडी नं. एमएच 32 एएस 5790 वाहन व घातक शस्त्रे मिळुन आली.


दि.14/10/2025 रोजी सांयकाळी साईबाबा मंदिर सोळा गुंठे परीसर शिर्डी येथे गर्दीचा फायदा घेवुन भाविक महिला व पुरुषांचे अंगावरील दागिने, मौल्यवान वस्तु व पैसे यांची संगनमताने घातक शस्त्रासह चोरी करुन दरोडा घालण्याचे पुर्वतयारीत असताना लाली लक्ष्मणसिंग, रुक्मीणी गोपाल सिंग, लच्चो लक्ष्मण सिंग, सितो प्रेम सिंग, कौशल्या हुकुम सिंग, भटेरा सिताराम सिंग सर्व रा. मरोली ता. होडल जि. फरीदाबाद, हरीयाणा यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता वरील पैकी लाली लक्ष्मणसिंग, रुक्मीणी गोपाल सिंग या कटर, ब्लेड अशा घातक शस्त्रासह मिळुन आल्या व इतर त्यांचे साथीदार गर्दीचा फायदा घेवुन पसार झाल्या.
दि.15/10/2025 रोजी सांयकाळी निर्मळ पिंप्री ता. राहाता येथील शिव महापुराण कथेचे मुख्य प्रवेशव्दाराजवळ संगनमताने घातक शस्त्रासह चोरी करुन दरोडा घालण्याचे पुर्वतयारीत असलेल्या काजल मनिष मालवी, रा. मनसा जि. निमज, मध्यप्रदेश, चंद्रवती लोधुकुमार हरजन, रा. रामबाग झोपडपटटी, उत्तरप्रदेश, मायादेवी अमरकुमार हरजन, रा. रामबाग झोपडपटटी, उत्तरप्रदेश, पुष्पादेवी जसवाल कुमार हरजन रा. रामबाग झोपडपटटी, उत्तरप्रदेश, मालादेवी बिसालकुमार हरजन, रा. रामबाग झोपडपटटी, उत्तरप्रदेश अशा 5 महिलांना पकडण्यात आले त्यांच्यावर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली आहे.
वरील 23 महिला व 03 पुरुष असे एकुण 26 आरोपीना अटक करुन सर्वांची नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे रवानगी करण्यात आली आहे.

पॉकेट चोरी, मोबाईल चोरी, चैन चोरी त्याचप्रमाणे मोबाईल चोरी होऊ नये यासाठी यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी महाराजांच्या कथा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या त्या ठिकाणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून देखील माहिती प्राप्त करण्यात आली होती. विशेषतः महिला सेक्टरमध्ये त्याचप्रमाणे सभामंडपात प्रवेश करावयाच्या ठिकाणी साध्या गणवेशांमध्ये पोलिस अंमलदार नेमण्यात आले होते.त्याचाच परिणाम म्हणून कथे दरम्यान वरील प्रकारच्या चोऱ्या नियंत्रणात ठेवण्यात मदत झाली.

काल रोजी पकडण्यात आलेल्या एका महिला चोरांच्या टोळीकडे तर महाराजांच्या पुढील दोन वर्षात ज्या ज्या ठिकाणी कथा होणार आहे त्या कथांचे तारीख, ठिकाण इत्यादी सविस्तर माहिती त्यांच्याकडे असणाऱ्या डायरीमध्ये मिळून आली.
त्या अनुषंगाने त्या त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला देखील या टोळीची माहिती कळवणार आहोत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here