संगमनेरच्या आर्थिक विश्वात नवे पाऊल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- शहरातील गणेश नगर येथे गंधे इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसच्या नव्या व अत्याधुनिक कार्यालयाचे उद्घाटन उद्योजक राजेश मालपाणी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडले.
या प्रसंगी संगमनेरच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपली उपस्थिती नोंदवत कार्यक्रमाची शान वाढवली. उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, ज्येष्ठ उद्योजक प्रदीपभाई शहा, अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे सीईओ अनिल शिंदे, उद्योजक शिरीष मुळे, बाळासाहेब देशमाने, सत्यम वारे, युवावार्ताचे संपादक किसन भाऊ हासे, अॅड. नितीन जोर्वेकर, सुनील गेठे, काळे (साहित्य परिषद), चाणक्य ग्रुपचे सदस्य, संगमनेर पुरोहित संघ, अमृतवहिनी इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी, तसेच प्रुडंट कॉर्पोरेट अॅडव्हायझरी सर्व्हिसेस, नाशिकचे प्रतिनिधी, गंधे परिवाराचे आप्तस्वकीय व हितचिंतक यांचा समावेश होता.
उद्योजक राजेश मालपाणी यांनी आपल्या भाषणात सांगितले, गुंतवणूक ही विश्वासावर आधारित असते. गंधे इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस गेल्या आठ वर्षांपासून पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देत आहेत. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो की, त्यांनी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आर्थिक स्वावलंबन आणि संपत्ती निर्मितीचा मार्ग दाखवावा.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रा. सौरभ गंधे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. शशांक गंधे यांनी केले. गंधे इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे हे नवे पाऊल केवळ कार्यालयाचे स्थलांतर नसून, संगमनेरच्या आर्थिक विकासाच्या दिशेने एक विश्वासार्ह आणि प्रगतिशील वाटचाल आहे.