थोरातांसाठी डॉ. जयश्री आघाडीवर तर खताळांची मदार विखे परिवारावर

1
1444

तुम्ही परिवर्तन करा विकासाची ग्वाही मी देतो- ना. विखे

तालुक्याची संस्कृती बिघडू देणार नाही- डॉ . जयश्री थोरात

युवावार्ता (संजय आहिरे)
संगमनेर – संगमनेर विधानसभा निवडणुक आता चांगलीच रंगात येत असून मतदारांच्या गाठीभेटीसोबतच आरोप प्रत्यारोप, इशारे प्रती इशारे दिले जात आहे. मात्र यात महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही उमेदवारांऐवजी त्यांच्या प्रचाराचा भार उचलणार्‍या डॉ. जयश्री थोरात व विखे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार आ. बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे व मविआचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्यावर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या पश्‍चात त्यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी ही त्यांची कन्या व तालुका युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ जयश्री थोरात सांभाळत आहेत. त्यांनी युवा संवाद यात्रेच्या माध् यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. मागील अनेक दिवसांपासून त्या पायाला भिंगरी लावून वडीलांसाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचार, रॅली, सभा, बैठका नियोजन करत आहेत. युवक, युवतींच्या साथीने त्या जोरदार प्रचार करत असल्याने विरोधकांच्या निशाण्यावर देखील डॉ. जयश्रीच आहे. धांदरफळ मध्येपरिवाराकडून होत असलेला प्रचार अधिक लक्षवेधी ठरत आहे. धांदरफळमध्ये देखील विरोधकांनी डॉ. जयश्री ला लक्ष करत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. मात्र या टिकेला तितकाच जोरदार प्रतिकार करत डॉ जयश्री यांनी आपण सहकारमहर्षींची नात असल्याचे दाखवून दिले. पोलिसांना जाब विचारत रात्र पोलीस ठाण्याबाहेर काढली. गुन्हा दाखल झाला परंतु लढा थांबवला नाही. त्यामुळे त्यांचे नेतृत्व आणखी उजाळून निघाले. आज त्या वडीलांसोबतच शेजारील राहता मतदारसंघाच्या महाआघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्यासाठी देखील रात्रंदिवस प्रचार करून मत मागत आहे. त्यांच्या प्रचार सभांना देखील युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. काँग्रसेचे महत्त्वाचे पुढारी यावेळी बाजूला असून डॉ. जयश्रीताई याच प्रचार प्रमुख व स्टार प्रमुख आहे. त्यांच्या या यशस्वी प्रचारामुळे बाळासाहेब थोरात यांच्यावरचा भार हलका झाला आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांना शह देणारा प्रभावी उमेदवार बलाढ्य महायुतीकडे तालुक्यात नव्हता. त्यामुळे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी सुरूवातीला या मतदारसंघात मोठ्या सभा घेऊन चांगलीच वातावरण निर्मिती केली. मात्र ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात येऊन अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली. अमोल खताळ हे सर्वसामान्य कार्यकर्ते असले तरी संजय गांधी निराधार योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, संगमनेर विधानसभा प्रमुख म्हणून त्यांनी अल्पावधीतच तालुक्यात युवकांचे मोठे जाळे निर्माण केले. विखेंचे कट्टर कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. मात्र आमदार बाळासाहेब थोरात यांना शह देण्याइतपत खताळ यांची ताकद नाही. त्यामुळे त्यांची सर्व मदार ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे व विखे परिवार त्याच बरोबर विखेंच्या यत्रणेवर अवलंबून आहे. या मतदार संघात ते ज्या शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारी करत आहे. त्या शिवसेनेची ताकद नगण्य आहे. कार्यकर्त्यांचे केडर नाही, संघटनात्मक बांधणी नाही. प्रभावी पदाधिकारी नाही. त्यातही खताळ हे भाजपमधून ऐनवेळी शिवसेनेत आल्याने या दोन्ही पक्षात पुरता ताळमेळ नाही. मात्र अमोल खताळ यांच्या प्रचाराची आणि विजयाची संपूर्ण जाबादारी ही ना. विखे व विखे परिवाराने घेतली आहे. खताळ यांच्या प्रचाराचा नाराळ फोडत विखे यांनी संगमनेरकरांना साद घातली. तुम्ही परिवर्तन करा विकासाची ग्वाही मी देतो, या तालुक्याच्या विकासासाठी जे-जे शक्य होईल ते सर्व करण्यास आपण कटीबद्ध आहोत अशी घोषणा केली. खताळ यांच्या प्रचारासाठी देखील ना. विखे, डॉ. सुजय विखे, शालिनीताई विखे या गावोगावी प्रचार सभा घेत आहे व घेणार आहे. विखे परिवाराला मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. अमोल खताळ यांनी केलेले काम व संघटन, महायुतीची ताकद, विखेंचे बळ या जोरावर अमोल खताळ ही अवघड लढाई यशस्वी लढण्यासाठी प्रयत्नशील आहे. एकूणच या मतदार संघात आ. बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ यांच्यात प्रत्यक्षात लढाई असली तरी त्यांच्यासाठी राबणारी प्रचार यंत्रणा महत्वाची ठरत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here