अध्यक्ष भंडारी, उपाध्यक्ष नावंदर, सेक्रेटरी गुंजाळ तर खजिनदारपदी पलोड
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -प्रथितयश उद्योजक गिरीश मालपाणी यांच्या संकल्पनेतून 7 ऑगष्ट 2024 रोजी सॅफ्रॉन लायन्स बिझनेस नेटवर्कची स्थापना करण्यात आली. लायन्स संगमनेर सॅफ्रॉन (सफायर) या सामाजिक काम करणार्या क्लबच्या अंतर्गत या संस्थेची स्थापना करण्यात आली. सॅफ्रॉन लायन्स बिझनेस नेटवर्कच्या अंतर्गत उद्योजकांना आपला व्यवसाय सर्वांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. या बिजनेस ग्रुपच्या माध्यमातून उद्योगाची वृध्दी व्हावी हा हेतू आहे. सर्व उद्योजकांची आपआपसाच ओळख होऊन सर्वांनी आपला व्यवसाय समजावून सांगितला तर उद्योगाची व्याप्ती आणि वृध्दी होण्यास मदत मिळणार आहे.सॅफ्रॉन लायन्स बिझनेस नेटवर्कच्या अध्यक्षपदी ला. श्रीनिवास भंडारी, सेक्रेटरीपदी ला. प्रशांत गुंजाळ तर खजिनदारपदी ला. मिलींद पलोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उद्योजक श्रीहरी नावंदर यांची उपाध्यक्ष म्हणून यावेळी निवड करण्यात आली.
या संस्थेच्या पहिल्याच सभेमध्ये सर्व उद्योजकांनी 1 मिनिटामध्ये आपआपल्या उद्योगाची ओळख करून दिली. संगमनेरमध्ये स्थापना झाल्यानंतर लायन्स बिझनेस नेटवर्कचे संपूर्ण महाराष्ट्रात जाळे तयार करणार असल्याचे लायन्स सॅफ्रॉनचे मा. अध्यक्ष गिरीश मालपाणी यांनी सांगितले. लायन्स सॅफ्रॉनचे अध्यक्ष स्वाती मालपाणी, सेक्रेटरी प्रा.डॉ. जितेंद्र पाटील, खजिनदार पूजा मर्दा आणि मा. अध्यक्षा सुनिता मालपाणी यांच्या हस्ते सॅफ्रॉन लायन्स बिझनेस नेटवर्कच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी अतुल अभंग, माधवी डिग्रसकर, शुभम तवरेज, धनंजय धुमाळ, सागर हासे, डॉ. अतुल देशमुख, गोरख कुटे, विजय ताजणे, अक्षय गोरले, महेश डंग, कल्पेश मर्दा, विशाल थोरात, डॉ. अमोल वालझाडे, अमोल भरीतकर, नामदेव मुळे, हरज्योतसिंग बत्रा, प्रशांत रहाणे, विवेक कोथमिरे, आनंद दर्डा, चंदन घुले, तुषार डागळे, डॉ. अमित ताजणे, सुभाष मनियार, मीना मनियार, गिरीश डागा, अजित भोत, शेखर गाडे, राधेश्याम राठी, सुदीप हासे, सार्थक कोठारी, संतोष अभंग, देविदास गोरे, राहुल बाहेती, आदित्य मालपाणी, सुजित दिघे, हरज्योतसिंग बत्रा, संदीप गुंजाळ, सचिन गाडे आदी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होत