संगमनेरात निर्भया पथकाची स्थापना

0
644

शाळा – महाविद्यालयात ठेवणार लक्ष

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – सध्या राज्यात विविध भागात मुली, महिलांवरील घडलेल्या अन्याय अत्याचाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. हे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी सरकार व पोलीस यंत्रणेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने निर्भया पथकाची स्थापना करून शाळा महाविद्यालय परिसरात गस्त घालणे, सीसीटीव्हीची तपासणी करणे, कुणी कुठे काही गैरप्रकार करत असेल तर त्याविरुद्ध त्वरित कारवाई करणे आदी कृती कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती पो. नि. बापुसाहेब महाजन यांनी दिली. शहरातील शाळा महाविद्यालयात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मुली शिक्षणासाठी येतात. काही टवाळखोरांकडून मुलींना त्रास देणे, छेडछाड करणे, मोठ्या आवाजाच्या गाड्या फिरवणे असे प्रकार केले जातात.

एखाद्या छोट्या प्रकरणातून निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतर्कता म्हणून पोलीसांनी कठोर उपाय योजना सुरू केल्या आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी व कायद्याचा जरब बसण्यासाठी शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंबंधी सर्व शाळा, मुख्यध्यापक, शिक्षक , विद्यार्थिनी यांना भेटून पोलीस स्टेशन स्तरावर नेमलेला स्टाफ निर्भया पथक प्रत्येक शाळेत जाऊन तेथे सीसीटीव्ही लावणे बाबत सूचना देत आहेत. तसेच महिला सुरक्षा बाबत मार्गदर्शन करीत आहेत. सोबतच योग्य त्या उपाय योजना करणे बाबत सूचना देत आहे. तशी रजिस्टरला नोंदी घेत आहे. कॉलेज, शाळा या भागात पेट्रोलिंग चालू करण्यात येत आहे. विध्यर्थीनी-पोलीस संवाद सोडून महिला पथक त्यांचे सामपोदेशन करीत आहेत. तसेच पोलीस स्टेशन स्थरावर महिला सुरक्षा निर्भया पथक महिला पोलिस आधिकारी व महिला कर्मचारी याचे तयार करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here