खड्डे आणि चिखलाने वाहनचालक त्रस्त

0
686

संगमनेर ते समनापूर रस्त्याची दुर्दशा

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असणार्‍या पावसामुळे सर्वत्र आनंदी वातावरण आहे. वर्षेभराची पाणी टंचाई दूर झाली असताना याच पावसामुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मात्र अनेक रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. कोल्हार – घोटी रस्त्यावरील संगमनेर ते समनापूर दरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे तर डांबरी शेजारच्या रस्त्यावर प्रचंड चिखल झाला आहे. खड्डे आणि चिखल यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने व वाहने घसरत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालक करत आहेत.


कोल्हार घोटी रस्त्याचे अनेक ठिकाणी नव्याने काम करण्यात आलेले आहे. मात्र या कामाची गुणवत्ता ठेवण्यात न आल्याने मुदतपूर्व हा रस्ता खराब झाला आहे. त्यातच सतत सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे.
रस्त्यावर पडलेल्या खेड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वेगात आलेल्या वाहनांना अंदाज येत नसल्याने ते या खड्ड्यात आदळतात. त्यामुळे एखादे वाहन पलटी होऊन अपघात देखील होऊ शकतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक ठिकाणी हे खड्डे बुजविण्यासाठी माती मिश्रित मुरूम टाकल्याधे पाण्यामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. या रस्त्यावरील संगमनेर पंचायत समिती ते समनापूर पर्यंत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. हे खड्डे चुकविणे किंवा डांबरी रस्त्यावरील चिखलातून मार्ग काढने वाहन चालकांसाठी मोठी कसरत आहे. अवजड वाहनांमुळे साईडपटृटयांवर खोल खड्डे पडले आहे, रस्त्याशेजारील मोकळ्या जागेत अनेक ठिकाणी मोठमोठे डबके तयार झाले आहे. हा महत्त्वाचा व नेहमी मोठ्या वर्दळीच्या रस्त्याची अशी दुरावस्था वाहन चालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावपावसाचे निमित्त असले तरी निकृष्ट पध्दतीने ठेकेदाराकडून होणार्‍या कामामुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. संगमनेर ते अकोले, भंडारदरा या नवीन रस्त्यावर देखील खड्डे पडू लागले आहे. नाशिक पुणे महामार्ग, कोल्हार घोटी रोड या दोन्ही रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून अपघात वाढत असताना त्याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने वाहन चालक, प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.


खड्यांमधून जातांना मोठी अवजड वाहने पलटी होतात की काय? असे अनेक वेळा चित्र दिसते. मात्र चालक मोठ्या शिताफीने आपल्या वाहनावर नियंत्रण मिळवत असल्याने अपघात टळतात. खड्ड्यांमुळे एखादा भीषण अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?, डांबरीवर चिखल झाला त्याला जबाबदार कोण असा प्रश्‍न नागरीक विचारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here