निवडणूक कामासाठी क्रीडा संकुलाचा वापर नका

0
1319

संगमनेर क्रिकेट असोसिएशनची मागणी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुका पातळीवरील अत्यंत अद्यावत सुसज्ज व देखण्या असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मैदानावर हिरवळ तयार करण्यात आली असून आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी बनवण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या काळात या मैदानाचा सर्रास वापर झाल्याने ही हिरवळ व खेळपट्टी खराब होईल त्यामुळे संगमनेर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या क्रीडा संकुलाचा वापर निवडणूक कामासाठी होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रांताधिकारी कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी शैलेश शिंदे यांना आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी अ‍ॅड सुहास आहेर, संदीप लोहे, अंबादास आडेप, निखिल पापडेजा, गिरीश गोरे , सचिन भालेकर, एकनाथ श्रीपाद, शेखर सोसे आदी उपस्थित होते.


या निवेदनात म्हटले आहे की आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पातळीवर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल हे अत्यंत अद्यावत बनवण्यात आले आहे. तालुका प्रेमींच्या मागणीनंतर मागील दोन वर्षापासून क्रीडांगणाचे सुशोभीकरण करण्यातून संपूर्ण क्रीडांगणावर मोठा खर्च करून हिरवळ तयार करण्यात आली आहे. त्यासाठी तुषार सिंचन यंत्रणा सुद्धा बसवण्यात आली आहे.
परंतु आगामी काळात निवडणुका होत असल्याने निवडणूक यंत्रणा, त्यांची निवास व्यवस्था, वाहन पार्किंग या सर्वांमुळे त्या ठिकाणी क्रीडांगणावरील हिरवळ व खेळपट्ट्या खराब होण्याची भीती आहे. तसेच हिरवळीच्या खाली असलेली पाईपलाईन तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेरच्या वतीने याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. यावर प्रांताधिकारी शैलेश हिंगे म्हणाले की, निवडणुकीच्या काळात संपूर्ण मैदान व खेळपट्ट्यांची काळजी घेतली जाईल. तसेच संपूर्ण मैदानावर नेटशेड व मेटिंग केली जाईल तसेच खेळपट्ट्यांच्या बाजूला बॅरिकेटिंग करण्यात येईल. आणि शासकीय व कोणत्याही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर मैदानात जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here