संपादिका सुशीला हासे यांना पितृशोक

0
1939

प्रगतशील शेतकरी तुकाराम विठोबा सहाणे यांचे अल्पशा आजाराने निधन

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – हिवरगाव आंबरे ता. अकोले येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम विठोबा सहाणे यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजता निधन झाले.
शेती व्यवसायात त्यांनी हिवरगाव येथे विविध प्रयोग केले. अतिशय करारी स्वभावाचे असलेले तुकाराम सहाणे यांनी गावाच्या विकासासाठी अनेक कामे केली. अनेकांचे प्रश्‍न सोडविले. देवठाण येथील धरणात जमीन गेल्यानंतर हिवरगाव आंबरे येथे ते स्थलांतरित झाले. आणि या ठिकाणी शेती व्यवसाय करीत त्यांनी कुटूंबाला स्थिरस्थावर केले.

This image has an empty alt attribute; its file name is job1.png

अतिशय धार्मिक स्वभावाचे व वारकरी सांप्रदयाचे असलेले तुकाराम सहाणे हे नेहमी हरिपाठ आणि तुकाराम गाथा पठण करायचे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर हिवरगाव आंबरे या ठिकाणी गुरूवारी दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्‍चात दोन मुले, चार मुली, पुतणे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक युवावार्ताच्या संपादिका सुशीला किसन हासे यांचे ते वडील तर संपादक किसन भाऊ हासे यांचे ते सासरे होते. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहाणे, हासे, भोर, गायकवाड व दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here