अगस्ती आश्रमातून वैभव पिचड यांच्या प्रचाराचा नारळ

वंदनीय पिचड साहेबांनी दूरदृष्टीने हा तालुका सुजलाम सुफलाम् केला

अकोलेत महायुतीला खिंडार
विधानसभा निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असुन राष्ट्रवादी कॅाग्रेस (अजित पवार) गटाचे नेते मा. जि. प. सदस्य कैलासराव वाकचौरे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यासह आ.लहामटे यांची अर्थात महायुतीची साथ सोडत आज अपक्ष उमेदवार मा.आ.वैभवराव पिचड यांना पाठिंबा दिला आहे त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे अमृतसागर दुध संघाचे संचालक गोरक्ष मालुंजकर हेदेखील आहेत.

अकोले प्रतिनिधी – पिचड साहेबांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याने माझी निवडणूक लढण्याची माणसीकता नव्हती. मी द्विधा मनस्थितीत होतो. त्यावेळी पिचड साहेबांचे जुने कार्यकर्ते व मित्र यांनी मला फोन करुन पिचड साहेब रडणारा नाही.. लढणारा आहे.. तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी भुमिका त्यांनी घेतली. माय बाप जनतेनेच आपला अर्ज भरला असून साहेबांच्या आशिर्वादाने निवडणूक लढवत आहे. मधुकरराव पिचड यांच्या आठवणीने मा.आ.वैभवराव पिचडांना अश्रू अनावर झाले. बुधवारी सकाळी अकोले येथील अगस्ती आश्रमात अकोले विधानसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार मा.आ.वैभवराव पिचड यांच्या प्रचाराचा नारळ वाहण्यात आला याप्रसंगी मा.आ.पिचड बोलत होते.
यावेळी त्यांची पत्नी सौ. पिचड, मुलगी डॉ. मधुरा पिचड, मुलगा यश पिचड, ज्येेष्ठ नेते शिवाजीराव धुमाळ, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, अगस्ती दुधचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सुनिल दातीर, यशवंतराव आभाळे, सुधाकर देशमुख, अरुण शेळके, राहुल बेनके, राहुल देशमुख, सोमनाथ मेंगाळ, आनंदराव वाकचौरे, अप्पासाहेब आवारी, राजुपाटील देशमुख, सीताराम देशमुख, कविराज भांगरे, गंगाधर नाईकवाडी, मा. नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, नगरसेविका शितल वैद्य, तमन्ना शेख, परशराम शेळके, मोहसिन शेख, सागर चौधरी, बाळासाहेब सावंत, सोमनाथ नवले सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अकोले शहरातील संपर्क कार्यालयापासून मा.आ.पिचड त्यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या ऑटो रिक्षातून रॅलीने कार्यकर्त्यासह अगस्ती मंदिरात आले. यावेळी सपत्नीक अगस्ती महराजांची पूजा करुन नारळ वाहण्यात आला. कार्यकर्त्याना संबोधित करताना पिचड म्हणाले कि वंदनीय पिचड साहेबांनी दूरदृष्टीने हा तालुका सुजलाम सुफलाम् केला आहे. साहेबांनी पाण्याचे अतुलनिय असे काम केले आहे. आज साहेबांनी निर्माण केलेली धरणे, बंधारे, केटिवेअर नसती तर तालुका भकास राहिला असता. तालुका बांधण्याचे काम साहेबांनी केले. आपल्याला आज अपक्ष अर्ज भरण्याची वेळ आली तुम्हाला माहित आहे. आपण पक्षाकडे तिकिट मागितले होते मिळाले नाही. परंतू काही हरकत नाही. परिक्षा घेणारी हि माय बाप जनता आहे आणि हि जनता राजाला रंक व भिका-याला राजा बनवू शकते. या माय बाप जनतेनेच आपला अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे जनतेने निर्णय घेतला आहे व तो निर्णय आपल्या बाजूनेच आहे असा विश्‍वास आहे. निवडणूक अर्ज भरण्यावेळी साहेब रुग्णालयात असल्याने मला वेळ देता येणार नाही याने माझे मन मला खात होते त्यामुळे मी माघारीचा अर्ज पाठवला होता. मात्र या माय बाप जनतेने कार्यकर्त्यानी माघारी अर्ज फाडून माझी उमेदवारी कायम ठेवली या जनतेच्या प्रेमाने मला येथे ओढून आणले आहे परंतु माझे मन अजून रुग्णालयात साहेबांच्या तब्बेतीकडे लागलेले आहे. आज कैलास भाऊ वाकचौरे, बाळासाहेब नाईकवाडी, गोरख मालुंजकर, प्रतापतात्या देशमुख आदिनी पाठिबा दिला आहे तर अनेक कार्यकर्त्यानी फोनवर चर्चा केली आहे येत्या काहि दिवसांत अनेक कार्यकर्ते पाठिंबा देणार असल्याचा दावाही पिचड यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख