आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत शिवसेनेला मोठे बळ

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -तालुक्यातील चंदनापुरी गावातील अनेक काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे चंदनापुरी परिसरात शिवसेनेला मोठे बळ मिळाले असून तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य श्याम रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हरिभाऊ सोन्याबापू रहाणे, सोपान निवृत्ती दुधवडे, पांडुरंग अण्णा काळे, रामदास काशिनाथ दुधवडे, खंडू अण्णा काळे, रवींद्र निवृत्ती काळे, रवींद्र सुनील मेंगाळ, नवनाथ रामनाथ दुधवडे, सागर पुंजा दुधवडे, दीपक बाळू दुधवडे, सचिन जनाभाऊ काळे, राहुल आनंदा मधे, विनीत निवृत्ती दुधवडे, सुनील सुभाष काळे, बाळासाहेब गंगाराम काळे, भाऊसाहेब पुंजा काळे, प्रीतम दिलीप दुधवडे, विठ्ठल सीताराम दुधवडे, अजय हरिभाऊ केदार, विकास शिवाजी दुधवडे, लक्ष्मण नाना दुधवडे, निलेश अशोक मधे, सचिन नाथा दुधवडे, अनिल वाळीबा फोडसे या तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत काम करण्याचा निर्धार व्यक्त करून प्रवेश केला आहे. यावेळी आमदार खताळ यांनी सर्व प्रवेश केलेल्या तरुणांचे शिवसेना पक्षाचे भगवे वस्त्र गळ्यात घालून स्वागत केले.
शिवसेना हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करणारा, लोकाभिमुख आणि लढवय्या पक्ष आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास हाच शिवसेनेचा केंद्रबिंदू असून, तरुणांच्या सक्रिय सहभागामुळे संघटना अधिक सक्षम, मजबूत आणि गतिमान होईल. चंदनापुरीसह संपूर्ण संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, मूलभूत सुविधा, रोजगार, शिक्षण आणि पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील असे आ. अमोल खताळ यांनी सांगितले.

















