भंडारदरासह निळवंडेही ओव्हरफ्लो, प्रवरेला पूर

0
763

नदी काठच्या नागरीकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने

युवावार्ता (प्रतिनिधी)
राजूर- भंडारदरा पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आज शनिवारी पावसाचा जोर वाढल्याने उत्तर नगर जिल्हाची जीवनदायनी असलेल्या भंडारदरा धरण आज 11 हजार 39 दशलक्ष घनफुटवर पाणी साठा झाला असून भंडारदरा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे धरणातुन आज सकाळी 7688 क्यूसेस पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले होते. तर जोरदार आवक होत असल्यामुळे भंडारदरा धरणातून सकाळी 11.30 वाजता तब्बल 16 हजार 164 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. तर दुपारी 12.30 वाजता निळवंडे धरणातून 10 हजार 230 क्युसेक्स, दुपारी 03.30 वाजता तब्बल 21765 क्युसेक्सने पाणी प्रवरानदीत झेपावत असल्याची माहिती भंडारदरा धरणाचे शाखाधिकारी अभिजित देशमुख यांनी दिली.


भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून घाटघर, रतनवाडी, पांजरे, उडदावणे, साम्रद परिसरात श्रावण सरी अधून-मधून जोरदार कोसळत आहेत. शनिवारी सकाळी भंडारदरा धरण 11 हजार 39 दशलक्ष घनफुटावर पाणी साठा पोहचल्यावर धरण पुर्ण क्षमतेने भरल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले. तर नवीन पाण्याची आवक जास्त वाढत असल्याने धरण साठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. दुपारीह03.30 वाजता निळवंडेतुन 21765 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असले तरी धरण पाणलोटात सतत पाऊस कोसळत असल्याने हा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदी दुथडी भरुन वाहत असल्याने रंधा धबधब्याने पुन्हा एकदा आक्राळ -विक्राळ रुद्र रुप धारण केल्याचे दिसत आहे. रंधाधबधबा पासुन पुढे मोठ्या प्रमाणात निळंवडे धरणाच्या जलाशयात नवीन पाण्याची झपाट्याने वाढ होत होत असून निळवंडे धरणे पुर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. या पाणलोटात पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने भंडारदरा ओव्हरफ्लो झाले तर निळवंडे देखील आज ओव्हरफ्लो होणार आहे. दोन्ही धरणातुन मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने प्रवरा नदीला मोठा पुर येण्याची शक्यता आहे. नदी काठच्या शेतकर्‍यांनी आपल्या वीज मोटारी किंवा इतर साहित्य त्वरीत काढुन घ्यावे तसेच पुलावर पाणी असताना कोणीही प्रवास करु नये. नदी काठच्या नागरीकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
नाशिक आणि नगर धरण पाणलोटात सध्या पावसाचा जोर वाढला असल्याने प्रवरा, गोदावरी, मुळा या तीनही नद्यातुन मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीच्या पोटात शिरत आहे त्यामुळे जायकवाडीचाही पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. जायकवाडीचा जलसाठा 50 टक्केच्या पुढे सरकला असुन आज मितीस धरणात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने नगर-नाशिक जिल्ह्यालाही दिलासा मिळाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here