कसारे शिवारात तब्बल तेरा टन गोमांस पकडले

0
1343

चाेवीस लाखांचा मुद्देमाल जप्त

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील कसारे गावच्या शिवारातील जांभुळवाडी फाटा ते विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावर तब्बल पाच टन गोमांसाची वाहतूक करणारा ट्रक संगमनेर तालुका पोलिसांनी पकडला. सदर कारवाई सोमवारी (दि.27 मे) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास करुन 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, जाकीरखान नसीरखान पठाण (वय 49, रा. मोगलपुरा, संगमनेर) व अय्युब मेहबूब कुरेशी (वय 53, रा. कुरणरोड, इस्लामपुरा, संगमनेर) हे दोघे आयशर ट्रकमधून (क्र. एमएच. 17, बीवाय. 7824) गोमांस घेऊन जात असल्याची माहिती गुप्त खबर्‍याकडून मिळाली होती. त्यानुसार पोहेकॉ. राजेंद्र पालवे आणि दत्तात्रय बडघे यांच्या पथकाने सापळा लावून हा ट्रक पकडला. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 50 हजार रुपयांचे पाच टन गोमांस आणि 5 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोहेकॉ. दत्तात्रय बडधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांवर तालुका पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. डी. जी. दिघे हे करत आहे.

सदर ट्रक पकडल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी फक्त ५ हजार किलो (५ टन) गोवंश मांस त्यामध्ये असल्याचा गुन्हा नोंदविला होता. परंतु बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांमुळे या ट्रकमध्ये तब्बल १३ हजार किलो (१३ टन) गोवंश मांस असल्याचे उघड झाले. संगमनेर तालुक्यातील लोहारे या ठिकाणी या ट्रकचे वजन केले असता मूळ वजनातून ट्रकचे वजन वजा केल्यानंतर १२ हजार ७९० किलो वजनाचे गोवंश मांस या ट्रकमध्ये असल्याचे आढळून आले. त्यामुळे आधी पोलिसांनी संपूर्ण आकडा लपवला असल्याचे यातून उघड झाले. वरील ८ टन गोवंश मांस कमी दाखवून पोलीस कुणाला पाठीशी घालणार होते, किंवा हे मांस कमी दाखवून काय साध्य करणार होते असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात जर गोमांस आढळून येत असेल तर रोज किती जनावरांची कत्तल होत असेल याचा हिशोब नाही.
या कारवाईत ट्रक 5 लाख आणि गोमांस १२७९० किलो १५० रु किलो प्रमाणे असे एकूण २४ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here