अर्धवट दुभाजकामुळे कारचा अपघात

0
917

कोणतीही जीवितहानी नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनरे –
शहरातून जाणार्‍या नाशिक-पुणे महामार्गावर टाकलेले जुने दुभाजक अनेक ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहे. रात्रीच्यावेळी या दुभाजकाचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्याने अनेकवेळा अपघात होत असतात. असाच अपघात बुधवारी रात्री शहरातील हॉटेल जोशी पॅलेस समोरच्या दुभाजकावर घडला. भरधाव वेगाने आलेली कार दुभाजकावर थेट चढल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.
बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास नाशिकडे जाणारी कार क्रमांक एमएच 31 एफई 0103 या कारचालकाला पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव असणारी कार दुभाजकावर चढली. सुमारे 10-15 फुट ही कार गेल्यानंतर बंद पडली. पाऊस व अंधार असल्याने वाहतूक कमी असल्याने मोठा अपघात टळला. या ठिकाणच्या दुभाजकाची उंंंची एकदम कमी असल्याने या दुभाजकाचा अंदाज वाहन चालकाला येत नसल्याने अशा प्रकारचे अपघात वारंवार होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here