पुण्यामध्ये अमृतवाहिनी इंजिनीरिंगचा माजी विद्यार्थी मेळावा

0
12

संगमनेर (प्रतिनिधी)-
माजी विद्यार्थी म्हणजेच अमृतवाहिनी चे खरे ‘ब्रँड अँबेसेडर’ आहेत आणि या माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामुळे आणि आपापल्या क्षेत्रातील यशस्वी भरारीमुळेच अमृतवाहिनीचे नाव अत्यूच्य शिखरावर पोहोचले आहे, मागील 42 वर्षांमध्ये अमृतवाहिनी महाविद्यालयाने गुणवत्ता जपून विविध मानांकने तसेच ऑटोनॉमस स्टेटस मिळवले आहे. माजी विद्यार्थी, औद्योगिक क्षेत्र यांच्या सहभागाने महाविद्यालयातील उपक्रमांना मदत होणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब नेहमीच माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाबद्दल कौतुक करत असतात असे प्रतिपादन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्‍वस्त सौ शरयू देशमुख यांनी केले.

संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा ‘मिलाप 2025, शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे येथील रागा पॅलेस येथे संपन्न झाला यावेळी त्याबोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर एम ए वेंकटेश, संस्थेचे डायरेक्टर अकॅडमीक्स डॉ.जे बी गुरव, माजी विद्यार्थी, व्हर्लपूलचे संचालक प्रफुल्ल गांधी, जग्वार अँड लॅन्ड रोवर पुणे चे पुरवठा साखळी व्यवस्थापन प्रमुख उत्तम गायकवाड, मॅनेजिंग पार्टनर, अंटल पुणेचे हेमंत पाटील, शैलेंद्र पांडे तसेच मायक्रोसॉफ्ट पुणे च्या मॅनेजर मोहिनी पाटील उपस्थित होते.
यावेळी शरयू देशमुख म्हणाल्या कि, अमृतवाहिनी संस्थेचे विद्यार्थी सध्या देश विदेशात चांगल्या पदावर कार्यरत आहे. हा संगमनेर करांसाठी अभिमान असून संस्थेचे माजी विद्यार्थी हेच अमृतवाहिनी चे खरे ब्रँड अँबेसिडर आहे. अमृतवाहिनीने गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा ते वृद्धिंगत व्हावी यासाठी विविध उपक्रम लाभले आहे. त्याचाच परिणाम म्हणून अमृतवाहिनी शिक्षण संस्था ज्ञानदानाची गंगोत्री ठरली आहे.

यावेळी प्राचार्य डॉ. एम. ए. म्हणाले,अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे आता एक महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. यापुढे महाविद्यालयाच्या गुणवत्ता वृद्धी साठी माजी विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंट, इंटर्नशिप, प्रोजेक्ट तसेच औद्योगिक भेटी इंडस्ट्रियल लेक्चर्स साठी वेळ द्यावा, आणि ऑटोनॉमस अभ्यासक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य करावे. महाविद्यालयाने अल्युमनी बडी योजना यापूर्वी सुरू केल्याने सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळत असून नुकतेच इनोवेशन अँड इंक्युबॅशन सेंटर सुरू केलेले आहे. यामध्ये नवनवीन स्टार्टअप, व्यवसाय वृद्धीसाठी माजी विद्यार्थ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे. यावेळी 429 माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात नोंदणीनंतर फन गेम्स ने झाली. यानंतर विभागानुसार माजी विद्यार्थ्यांनी पॅनेल चर्चा मध्ये भाग नोंदवला. यामध्ये संबंधित क्षेत्रातील आधुनिक घडामोडी इंजीनियरिंग ट्रेंड्स, मार्केट याबद्दल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा प्रभाव यावर माजी विद्यार्थ्यांनी आपली मते नोंदवली.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्‍वस्त मा. आ. डॉ. सुधीर तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आणि सहकार्याबद्दल अभिनंदन केले आहे. मुख्य कार्यक्रमाचे स्वागत मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डॉ. व्ही डी वाकचौरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा मयुरी गाढे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन टीपीओ प्रा प्रवीण वाकचौरे यांनी केले. यावेळी 429 माजी विद्यार्थी, सर्व विभागप्रमुख, आणि ज्येष्ठ शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here