अहिल्यानगर जि.प. अध्यक्षपदाच्या आरक्षणाने बदलला राजकीय समीकरणांचा खेळ

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर -अहिल्यानगर जिल्हा परिषदेची गट व गण रचना अंतिम झाल्यानंतर आता जि. प. अध्यक्ष व पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण जारी झाले. तब्बल 63 वर्षानंतर प्रथमच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसुचित जमाती महिला पदासाठी राखीव झाले. यापूर्वी कै. अशोकराव भांगरे यांनी 1998-99 मध्ये अध्यक्षपद भूषवले होते. जिल्हा परिषदेचे 75 गट व 150 गण रचनेचा आराखडा जिल्हा शासनाने अंतिम केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या आरक्षणाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात अनुसुचित जाती महिला (एससी) एक, अनुसुचित जमाती महिला (एसटी) 1, नामाप्र व्यक्ती 2, नामाप्र महिला 2, सर्वसाधारण 3, सर्वसाधारण महिला 3 जागा सभापतीसाठी राखीव आहेत. दरम्यान, गट व गण आरक्षणाबाबत अद्याप निर्णय झाला नाही.
मागील 63 वर्षांचा कार्यकाळ पाहता जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी अध्यक्षपद भुषवल्याचे दिसून येते. या निवडणुकीत गट व गणांच्या आरक्षण सलग 10 वर्षे काळे होते अध्यक्ष सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण सोडतीनंतर भेटी गाठींना वेग येणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी (12 सप्टेंबर 2025) शासनाचे सहसचिव व.मुं. भरोसे यांनी अधीसूचना जारी केली. त्यात अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसुचित जमाती महिला (एसटी) प्रवर्गासाठी राखीव झाले
जिल्हा लोकल बोर्डाच्या बरखास्तीनंतर पंचायत राज व्यवस्था 1960-62 पासून अस्तित्वात आली. त्यानंतर 1998 मध्ये एसटी प्रवर्गातून कै. अशोकराव भांगरे यांनी जि.प. अध्यक्ष राहिले. परंतू, एसटी महिलेसाठी तब्बल 63 वर्षानंतर अध्यक्षपद राखीव झाले. दरम्यान, मातब्बरांनी यंदाच्या निवडणुकीतही अध्यक्षपदाची तयारी चालवली होती. परंतू, पद आरक्षीत झाल्याने इतर काही इच्छूक मातब्बरांना अडीच वर्षे वाट पहावी लागणार आहे.
जिल्हा लोकल बोर्डाच्या बरखास्तीनंतर अस्तित्वात आलेल्या जिल्हा परिषदेत 1962 ते आहे. 1967 व 1967 ते 1972 या दोन पंचवार्षीकमध्ये सलग दहा शंकरराव देवरा काळे यांनी अध्यक्षपद भुषवीले. माजी जि.प. अध्यक्ष शालीनी विखे यांनी 2007 ते 2012 व 2017 ते 2019 या कालावधीत अध्यक्षपदाची धुरा सांभाळली.