अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 75 गटांची आरक्षण सोडत जाहीर

0
30

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या 75 गटांच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसीया यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (13 ऑक्टोबर) काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 7,अनुसूचित जातीसाठी 9, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) 20 आणि सर्वसाधारणसाठी 39 असे एकूण 75 गट आरक्षित झाले आहेत. या 75 गटांपैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसीसह सर्वसाधारण असे एकूण 38 जिल्हा परिषद गट महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. आता दिवाळीनंतर या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग येणार आहे.
38 गट महिलांसाठी राखीव
जिल्हा परिषदेच्या 75 गटांपैकी अनुसूचित जातीसाठी 9 जागा आरक्षित असून यापैकी 5 गट महिलांसाठी आहेत. अनुसूचित जमातीसाठी 7 गट आरक्षित असून यापैकी 4 गट महिलांसाठी आरक्षित आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 20 जागा आरक्षित असून यामध्ये 10 जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारणसाठी 39 गट आरक्षित असून यापैकी 19 गट महिलांसाठी आरक्षित आहेत. एकूण 75 पैकी 38 गट महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण वर्गातून महिला उमेदवारी करू शकतात. त्यामुळे झेडपीच्या कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती राहणार आहे.

कुठून होणार झेडपी अध्यक्ष-
राज्य पातळीवरच्या सोडतीत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित यापूर्वीच करण्यात आले. त्यामुळे सोमवारी झालेल्या गटांच्या आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेत कोणते गट अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षित होतात? याकडे लक्ष लागले होते. सोडतीच्या या प्रक्रियेत अकोले तालुक्यातील सातेवाडी, देवठाण, संगमनेर तालुक्यातील बोटा आणि राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर हे जि. प. गट अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या गटातून झेडपी अध्यक्ष होणार आहे.
अकोले
समशेरपूर : अनुसूचित जमाती
देवठाण : अनुसूचित जमाती महिला
धामणगाव आवारी: सर्वसाधारण महिला
राजूर : अनुसूचित जमाती
सातेवाडी : अनुसूचित जमाती महिला
कोतूळ : अनुसूचित जमाती
राहाता
पुणतांबा : अनुसूचित जाती
वाकडी : अनुसूचित जाती
साकुरी : अनुसूचित जाती महिला
लोणी खुर्द : नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हार बुद्रूक : सर्वसाधारण महिला

कोपरगाव
सुरेगाव : ना. मागास प्रवर्ग महिला
ब्राम्हणगाव : सर्वसाधारण
संवत्सर : सर्वसाधारण
शिंगणापूर : ना. मागास प्रवर्ग महिला
पोहेगाव बुद्रूक : सर्वसाधारण महिला
श्रीरामपूर
उंदीरगाव : अनुसूचित जाती महिला
टाकळीभान: सर्वसाधारण महिला
दत्तनगर : अनुसूचित जाती
बेलापूर : अनुसूचित जाती महिला

शेवगाव
दहिगावने : सर्वसाधारण
बोधेगाव : सर्वसाधारण
भातकुडगाव : अनुसूचित जाती महिला
लाडजळगांव ना. मागास प्रवर्ग महिला
संगमनेर
समनापूर : ना. मागास प्रवर्ग महिला
तळेगाव : सर्वसाधारण महिला
आश्‍वी बु. : ना. मागास प्रवर्ग महिला.
जोर्वे: नागरिकांचा मागास प्रवर्ग
घुलेवाडी : सर्वसाधारण
धांदरफळ बुद्रुक : सर्वसाधारण
चंदनापुरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
बोटा: अनुसूचित जमाती महिला
साकूर : सर्वसाधारण

नेवासा
बेलपिंपळगाव: सर्वसाधारण महिला
कुकाणा : सर्वसाधारण महिला
भेंडा बु : सर्वसाधारण
भानसहिवरे : सर्वसाधारण
खरवंडी : सर्वसाधारण महिला
सोनई: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
चांदा: सर्वसाधारण महिला
राहुरी
टाकळीमिया : ना. मागास प्रवर्ग महिला
ब्राह्मणी : सर्वसाधारण
गुहा : सर्वसाधारण
बारगाव नांदूर : अनु. जमाती महिला
वांबोरी: सर्वसाधारण महिला

पाथर्डी
कासार पिंपळगाव : सर्वसाधारण
भालगाव : सर्वसाधारण
तिसगाव : सर्वसाधारण
मिरी सर्वसाधारण महिला
टाकळीमानूर : सर्वसाधारण महिला
अहिल्यानगर
नवनागापूर: सर्वसाधारण महिला
जेऊर : ना. मागास प्रवर्ग महिला
नागरदेवळे : अनुसूचित जाती महिला
दरेवाडी : अनुसूचित जाती महिला
निंबळक नागरिकांचा मागास प्रवर्ग
वाळकी: नागरिकांचा मागास प्रवर्ग
पारनेर
टाकळी ढोकेश्‍वर : सर्वसाधारण महिला
ढवळपुरी : सर्वसाधारण महिला
जवळा : नागरिकांचा मागास प्रवर्ग
निघोज : नागरिकांचा मागास प्रवर्ग
सुपा : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

श्रीगोंदा-
येळपणे : सर्वसाधारण
कोळगाव : सर्वसाधारण
मांडवगण : सर्वसाधारण महिला
आढळगाव : सर्वसाधारण महिला
बेलवंडी : सर्वसाधारण
काष्टी: नागरिकांचा मागास प्रवर्ग
कर्जत-
मिरजगाव : सर्वसाधारण
चापडगाव : सर्वसाधारण महिला
कुळधरण : नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोरेगाव : सर्वसाधारण महिला
राशीन : नागरिकांचा मागास प्रवर्ग
जामखेड-
साकत : सर्वसाधारण
खर्डा : सर्वसाधारण
जवळा- ना. मागास प्रवर्ग महिला
जाहीर झालेल्या या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. परंतू आपण नाही तर आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून काहीजण या निवडणूकीची तयारी करीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here