आधारचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

0
35

युवावार्ता (प्रतिनिधी):-संगमनेर – अतिवृष्टीमुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा संकटात असताना त्याच्या प्रती उतराई होण्यासाठी त्यांच्यावर आलेल्या घोर संकटात त्यांना उभारी देण्यासाठी दिवाळी किराणा किट व बहिणीसाठी साडी घेऊन आले असल्याची भावना वाघोली येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश भालसिंग यांनी व्यक्त केली.
संगमनेर येथील आधार फाउंडेशन ही संस्था शेवगाव येथील अतिवृष्टीने पूरग्रस्त बांधव भायगाव, काळेगाव, बक्तरपूर, खामगाव, वाघोली साडेतीन लाख रुपये किंमतीच्या 150 दिवाळी किराणा किट, प्रत्येक कुटुंबातील बहिणीसाठी 250 साड्यांची दिवाळी भेट देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने वंचितांची दिवाळी साजरी केली.

गावातील नदीकाठ परिसरात प्रत्येक कुटुंबातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत योग्य व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी आधार फाउंडेशनच्या शिलेदारांनी प्रयत्नाची शिकस्त केली, यासाठी आधार फाउंडेशनचे समन्वयक सुखदेव इल्हे, डॉ. महादेव अरगडे, अनिल कडलग, विठ्ठल कडुसकर, पी. डी. सोनवणे, सोमनाथ मदने, लक्ष्मण कोते, बाळासाहेब पिंगळे, तानाजी आंधळे, विनोद राऊत, प्रकल्प प्रमुख देविदास गोरे आदींनी मदतीसाठी केलेल्या आवाहनानुसार मोठ्या प्रमाणात मदत जमा झाली. संगम पतसंस्था, दैनिक युवावार्ता परिवार, सो. ता. कळसकर गुरूजी व इतर हिंतचिंतकांनी 52 हजार रुपयांची वैशिष्ट्यपूर्ण मदत आधारचे शिलेदार किसन हासे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाली.

शेवगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते उमेश भालसिंग यांच्या मार्गदर्शनानुसार विष्णू बढे, मच्छिंद्र नजन, भायगाव येथील नाना लांडे, अमोल आढाव, काळेगाव येथील योगेश काळे, बक्तरपुर येथील युवा सरपंच राहुल बेडके, खामगाव येथील सरपंच सुभाष बधदे, वाघोली येथील संतोष आल्हाट, सुभाष दातीर राजेंद्र जमधडे, दादासाहेब जगदाळे आदी कार्यकर्त्यांनी योग्य गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी आधार फाउंडेशनचे सदस्य राजेंद्र फरगडे, मा. प्राचार्य पी. आर. शिंदे, शिवव्याख्याते दीपक कर्पे, प्राचार्य बाळासाहेब आहेर, सोमनाथ गडाख, सामाजिक कार्यकर्ते पंडित गुंजाळ, निवृत्ती शिर्के, भाऊसाहेब वैद्य, उत्तम देशमुख, कैलास कानवडे, सुभाष घनदाट, श्रीकांत बिडवे, गोरक्ष हासे, हरिओम बिडवे, बाळासाहेब रोकडे, योगेश रहाणे आदींनी पूरग्रस्त शेतकर्‍यांपर्यंत किट, साडी पोचवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. महेश जगताप यांनी किराणा पोहोचवण्यासाठी मोफत ट्रक उपलब्ध करून दिला तर चैतन्य पेट्रोल पंपाचे मालक सुनील नवले यांनी मोफत इंधन उपलब्ध करून दिले. खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष बडधे यांनी आधारच्या कामासाठी पाच हजार रुपयाची देणगी दिली. या प्रत्येक गावात गरजू कुटुंबातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पावसाने दप्तर वाहून गेले अशा पाचवी ते दहावीतील दहा मुलांना आधार फाउंडेशनने शिक्षणात बळ देण्यासाठी दप्तर, शालेय साहित्य देण्यात आले. आमची दिवाळी गोड करण्यासाठी संगमनेर येथील शेकडो किलोमीटर अंतरावरून आलेल्या सर्व आधार फाउंडेशनच्या शिलेदारांसाठी वाघोली येथील संतोष आल्हाट यांचे घरी पूरग्रस्त महिलांनी एकत्र येऊन घरगुती जेवण बनवून प्रेमाने खाऊ घालत माणुसकीचे दर्शन घडविले. आधारची मदत हातात पडतात मिळालेले किराणा किट व भाऊबीजेसाठी मिळालेली साडी पाहून अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते.
प्रकल्प प्रमुख देविदास गोरे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी आधारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आधारवर टाकलेल्या विश्‍वासावर शेकडो बांधवांनी लाखमोलाची मदत केल्याबद्दल त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here