जवळपास 4300 स्क्वे.फूट मध्ये ए. एस. फिटनेस स्टुडिओ सुरु, विविध प्रशिक्षण सुविधा उपलब्ध
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – आपले आरोग्य निरोगी व सुदृढ राहण्यासाठी मेहनत घेणार्या तरूणाईसाठी साहेबराव अभंग, अतुल अभंग, सुशांत अभंग व अभंग परिवाराच्यावतीने ए. एस. फिटनेस स्टुडिओची उभारणी केली आहे. शहरातील बी.एड कॉलेज समोर अभंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या या भव्य फिटनेस स्टुडिओचा शुभारंभ शनिवार दि. 25 जानेवारी रोजी दुपारी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर हे फिटनेस स्टुडिओ ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे.
आ. सत्यजीत तांबे, आ. अमोल खताळ, उद्योजक गिरीष मालपाणी, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, डॉ. जयश्री थोरात, विश्वास मुर्तडक, नवनाथ अरगडे, गजेंद्र अभंग, धनंजय डाके, सोनूशेठ राजपाल, डॉ. प्रतिक वाणी यांच्यासह अनेक मान्यवर उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते.
नागरिकांची मागणी आणि गरज लक्षात घेता 4300 स्क्वे.फूट. भव्य जागेत अद्ययावत मशिनरी आणि जीम साहित्यासह हा स्टुडिओ पुन्हा सुरू झाला आहे. या अद्ययावत फिटनेस स्टुडिओमध्ये आरोग्याची गरज ओळखून सर्व नाविण्यपूर्ण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षित जीम ट्रेनर्सच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाणार आहे. या ठिकाणी केवळ व्यायामच नाही तर योगाचे ट्रेनिंगही दिले जाणार आहे.
पर्सनल ट्रेनिंग, स्ट्रेन्थ ट्रेनिंग, कार्डिओ ट्रेनिंग, फंक्शनल ट्रेनिंग, किड्स वर्कआऊट, टी. आर. एक्स वर्कआऊट यासह सर्व व्यायाम प्रकार करुन घेतला जाणार आहे. सर्व अद्यावत जीम मशिनरीज, प्रशस्त जागा, वैयक्तिक लक्ष अशा या ए. एस फिटनेस स्टिुडिओ सुरू झाला आहे. अधिक माहितीसाठी 8767514059 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सुशांत अभंग यांनी केले.