आ.बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी फेरनिवड

0
682

आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाकडून मोठी जबाबदारी

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत सैनिक असलेले राज्याचे मा. प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून काँग्रेसच्या सर्वोच्च समजल्या जाणार्‍या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे व राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकारद्वारे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड जाहीर केली.


स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा लाभलेले आमदार बाळासाहेब थोरात हे 1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी होत विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. याचबरोबर राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, जलसंधारण,रोहयो,खारजमीन,राजशिष्टाचार अशा आठ विभागांची जबाबदारी सांभाळताना या सर्व विभागांना लोकाभिमुख केले. महसूलमंत्री असताना ऑनलाईन सातबारा आठ अ तसेच विद्यार्थ्यांना शाळेतच 80 लाख दाखले देण्याचा विक्रम केला होता. शिक्षणमंत्री काळात बेस्ट ऑफ फाईव्ह तर कृषी मंत्री काळात एक लाख शेततळ्यांची निर्मिती केली.


2018 मध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर पक्षाने गुजरात निवडणुकीची जबाबदारी सोपवली.यामध्ये काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले. यानंतर हिमाचल प्रदेशच्या निरीक्षकपदी ही आमदार थोरात यांनी काम केले. 2019 मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीवर त्यांची निवड झाली होती. तर जुलै 2019 मध्ये पक्ष अत्यंत अडचणीत असताना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी 44 आमदार निवडून आणले .याचबरोबर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्ये मोलाचा वाटा उचलला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महसूलमंत्रीपद सांभाळताना ई – पीक पाहणी सह शेतकर्‍यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली. याच काळामध्ये निळवंडे कालव्यांना अत्यंत गती देताना कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाचे स्वप्न पूर्ण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here