जमावाकडून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यास बेदम मारहाण
6 अनोळखी इसमांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका समाजाच्या जमावाने पेट्रोल पंपावरील कर्मचार्याला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी सकाळी 6 च्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील आडवा ओढा, संगमनेर खुर्द येथील ढेरंगे पेट्रोलपंपावर घडली. त्या प्रकरणी 6 अनोळखी इसमांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील ढेरंगे पेट्रोल पंपावर सकाळी 6 च्या सुमारास लाल रंगाची इंडिका व्हिस्टा कार क्र. एम एच 43 एक्स 2749 यामधील बसलेल्या एका इसमाने पेट्रोल पंपावलरील कर्मचारी लखन बाबाराजा गायकवाड (वय-21) रा. वैदुवाडी, संगमनेर यास दम देत एवढा हळू का येतो? तुला लवकर येता येत नाही का? असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी सदर कर्मचारी लखन गायकवाड याने तुम्ही शिव्या देऊ नका, मी लगेच आलो आहे असे म्हटले. याचा राग येवून या कारमधील एका इसमाने लखन यास मारहाण सुरू केली. त्यानंतर कारमधील इतर 5 जणांनी उतरून लखन यास लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी फिर्यादीचा मित्र किशोर ढोमसे हा मदतीला आला असता त्यालाही या अनोळखी तरूणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी फिर्यादी लखन गायकवाड याच्या फिर्यादीवरून6 अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा रजि. नं. 495/2024 भा.द.वि. कलम 143, 146, 147, 149, 323, 504, 506, या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पो. निरीक्षक भगवान मथुरे यांंच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. रमेश पाटील करीत आहेत.
सीसीटीव्ही तपास केला असता घटनेतील सर्व आरोपी हे मुस्लीम समाजाचे असल्याने व या प्रकारणाचा व्हिडीओ सोशल माध्यमावर वेगाने प्रसारीत झाल्याने या प्रकारणाचा सर्वत्र संताप व्यक्त होत असून अशा टवाळखोर व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.