तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
अकोले (प्रतिनिधी)-
तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुगाव येथील युवकाच्या कुटुंबास भरीव आर्थिक मदत करावी. तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा द्यावा. या मागण्यांसाठी काल सोमवारी विविध सामाजिक व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. याप्रकरणी निवेदन देण्यासाठी गेलेले असताना तहसीलदार उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन केले. तर तीन तासांनंतर कार्यालयात आलेल्या तहसीलदारांवर कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला.
तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीपात्रात पोहताना बुडालेल्या अर्जुन जेडगुले या तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेण्याच्या प्रयत्नात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे तीन जवान व स्थानिक तरुणाचा बळी गेला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्य हळहळले. त्यानंतर आता प्रशासनावर विविध आरोप सुरु झाले आहेत. सोमवारी सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते, परंतु तहसीलदार सिद्धार्थ मोरे हे उपस्थित नव्हते. परिणामी कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. तहसीलदार मोरे हे तब्बल तीन तासांनंतर कार्यालयात पोहचले. या ठिय्या आंदोलनात एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार करत आपत्ती व्यवस्थापन पथकाला घटनास्थळी पाचारण कोणी केले होते? हे शोधणे त्यांचे काम आहे का? तर पथकाचे मृतदेह शोधणे की जिवंत माणसाला आपत्तीतून वाचवणे हे काम आहे? नेत्यांनी पाणी बंद करणे गरजेचे होते. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. या घटनेमुळे मृत झालेल्यांचे घर उद्वस्त झाले आहे. त्या परिवाराला मदत व्हावी तसेच गणेश देशमुख याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे. शासनाने या घटनेबाबत केलेल्या पाठपुराव्याची माहिती द्यावी. तहसीलदार पालकमंत्र्यांच्या दबावाखाली होते का? असे प्रश्न उपस्थित केले.
संकटकाळात दंडाधिकारी आपले काम सोडून राजकारण करत असून तहसीलदारांनी या घटनेत जबाबदारी पाळली गेली नाही. आचारसंहितेच्या काळात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या घटनेला पालकमंत्री जबाबदार असून मृताच्या कुटुंबाला केलेली मदत तुटपुंजी आहे. राष्ट्रीय कामात मदत करणार्या गणेश देशमुखच्या कुटुंबाला मोठी मदत केली पाहिजे. तसेच चार जणांच्या कुटुंबाला भरीव मदत करावी. अन्यथा जनआक्रोश होईल. याशिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केली. जिवंत लोकांना बाहेर काढण्याचे की मृत लोकांना बाहेर काढणे आपत्ती पथकाचे काम असते याचा खुलासा हवा. प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभे केले पाहिजे, अशी मागणी यावेळी माकप नेते डॉ. अजित नवले यांनी केली. यावेळी शिवसेनेचे महेश नवले, प्रदीप हासे, संदीप दराडे, बबनराव तिकांडे, कॉ. तुळशीराम कातोरे, डॉ. संदीप कडलग, सुरेश नवले, आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होत