10 राज्यात 96 जागांसह राज्यातील 15 जागांवर मतदान, मतदानात निरूत्साह
217 संगमनेर विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 79 हजार 791मतदार असून यात 1 लाख 44 हजार 664 पुरूष मतदार तर 1 लाख 35 हजार 127 महिला मतदार आहे.
तर शिर्डी लोकसभा मतदार संघातील –
संगमनेर विधानसभा-57.79% टक्के
अकोला विधानसभा- 53.9% टक्के
शिर्डी विधानसभा-56.72% टक्के
श्रीरामपूर विधानसभा- 54.18% टक्के
कोपरगाव विधानसभा-52.92 टक्के
नेवासा विधानसभा-56.09 % टक्के
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आज सोमवार सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. प्रशासनाने या निवडणूकीची जय्यत तयारी करत मतदारांना मतदानाचे आवाहन केले. मात्र सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. काही ठिकाणी मतदारांना आपले नाव यादीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता. काही मतदान केंद्रावर सकाळपासून थोडीफार उपस्थिती होती पण प्रशासनाने मोबाईलबाबतच्या निर्णयामुळे अनेकजण माघारी परतले. ग्रामीण भागामध्ये तर सकाळपासूनच निरुत्साह काही ठिकाणी दिसून आला.
नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होण्यासाठी जनजागृती केली आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मतदान केंद्राच्या बाहेर काही ठिकाणी मंडप घालण्यात आले होते. तसेच पिण्याच्या पाण्याची देखील सोय करण्यात आली होती. परंतु ज्येष्ठांना त्या ठिकाणी बसण्यासाठी कोणीच सुविधा उपलब्ध नव्हते, अशी स्थिती दिसून आली. अनेकांना मतदानाच्या स्लीप या मिळाल्या नव्हत्या, त्यामुळे आपले केंद्र कोठे आहे आणि आपले मतदार यादीत नाव आहे की नाही याबाबतही गोंधळ निर्माण झाला होता. मतदान केंद्राच्या आवारामध्ये मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणालाही आत मध्ये मोबाईल नेता आला नाही. या निर्णयाच्या कडक अंमलबजावणीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.लोकसभा निवडणुकीसाठी 10 राज्यातील 96 मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. यात राज्यातील महत्त्वपूर्ण ठरणार्या 11 जागांचा समावेश आहे.
अहमदनगर, शिर्डी, बीड, पुणे, शिरूर, मावळ, छत्रपती संभाजी नगर, जालना, धुळे, रावेर आणि नंदुरबार या राज्यातील पंधरा जागांचा आज होत असलेल्या मतदानात समावेश आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने या जागांवरून मातब्बरांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल. राज्यातील महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांच्या मूळ गावी जोर्वे ता.संगमनेर येथे सकाळीच मतदान केले. तर याच मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातील अकोले येथे मतदान केले.
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले आहे.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार – ४९.९१ टक्के
जळगाव – ४२.१५ टक्के
रावेर – ४५.२६ टक्के
जालना – ४७.५१ टक्के
औरंगाबाद – ४३.७६ टक्के
मावळ – ३६.५४ टक्के
पुणे – ३५.६१ टक्के
शिरूर – ३६.४३ टक्के
अहमदनगर- ४१.३५ टक्के
शिर्डी – ४४.८७ टक्के
बीड – ४६.४९ टक्के
अहमदनगर : सायंकाळी पाच वाजेपर्यंत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ५३.२७ टक्के मतदान. सर्वाधिक कर्जत जामखेड : ५७.२०, पारनेर सर्वांत कमी ४६.६० टक्के. नगर शहर : ५४.५०, राहुरी : ५६.२०, शेवगाव : ५४.१८ व श्रीगोंदा : ५१.२४