संगमनेरमध्ये रामजन्मोत्सवाचे स्वागत

0
1218

आयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हा पहिलाच रामनवमीचा उत्सव

संगमनेर – प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी करत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. आयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हा पहिलाच रामनवमीचा उत्सव आहे. त्यामुळे भाविकांच्या चेहर्‍यावर यावेळी प्रचंड आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संगमनेर – प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या श्रीसाई मंदिरात श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्रीराम मुर्ती पाळण्यात ठेवून महिला भाविकांकडून अंगाई गीत भजने म्हणण्यात आले. यावेळी आरती, प्रसाद वाटप केला…..प्रसाद सुतार, संगमनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here