कारभारी दादा शिवार प्रतिष्ठानच्या वतीने चर्चासत्राचे आयाेजन
अनेक प्रश्नांची हाेणार उकल
कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान च्या वतीने टोमॅटो पिकावर चर्चा सत्र, पीक पाहणी आणि शेतकरी संवाद यात्रा रविवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२:३० या वेळेत सोनोशी ता. संगमनेर येथे आयोजित करण्यात आली आहे.
टोमॅटो उत्पादक शेतकरी, कामगार, शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठातील प्राध्यापक, कृषी अधिकारी, दुकानदार, नर्सरी, औषध कंपनी, व्यापारी आणि ग्राहक सगळे घटक प्रथमच एकाच बांधावर येणार आहेत.
अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, राहुरी विद्यापीठातील भाजीपाला पैदासकार डॉ बी टी पाटील, प्रा पवार, प्रा बाचकर आणि इंसेटीसाईड इंडीया चे मॅनेजर नरेंद्र देशमुख हे मागदर्शन करणार आहेत.
फ्रूट वाला बागायतदार चे गणेश नाझिरकर , अजित कोरडे ,कृषी अधिकारी विलास गायकवाड, प्रवीण गोसावी, विरेंद्र थोरात, व्यापारी राजूशेठ अभंग , राम ढेरांगे यांचेही टोमॅटो वरील अनुभव ऐकायाला मिळतील.
२५ एकर क्षेत्रावर एकसारखे अचूक कामाचे यशस्वी टोमॅटो उत्पादनचे नियोजन पाहण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. शिवार फेरी, मार्गदर्शन, प्रश्न – उत्तरे, स्नेहभोजन असा हा कार्यक्रम राहील.
संगमनेर आणि सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन कारभारी दादा शिवार प्रतिष्ठान च्या पदाधिकारी आणि गिते परिवाराने केले आहे.