जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा

0
214

16 ते 21 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत

युवावार्ता (प्रतिनिधी)-
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. त्यात आयोगाने राज्यातील प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी राज्यात निवडणूक होईल. यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य निवडणूक आयोगाला या निवडणुका 15 फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाची प्रसिद्धी 16 जानेवारी रोजी केली जाईल. त्यानंतर 16 ते 21 जानेवारीपर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 22 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप 27 जानेवारी रोजी दुपारी 3.30 नंतर केले जाईल. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर 7 फेब्रवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील.

या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला 2 मते द्यावे लागतील. यातील एक मत जिल्हा परिषद व दुसरे पंचायत समितीसाठी असेल. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येईल. विविध राजकीय पक्ष व उमेदवारांच्या मागणीनुसार ही प्रक्रिया महापालिका निवडणुकीसारखीच राबवण्यात येत आहे. या निवडणुकीत ज्या जागा राखीव आहेत. त्या जागांवर जातवैधता पडताळणी आवश्यक आहे. जातप्रमाणपत्र व जातवैधता पडताळणी उमेदवारी अर्जासोबत सादर करणे महत्त्वाचे आहे. पण एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल, तर त्याने जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा सादर करावा लागेल. पण निवडून आल्यानंतर त्याला 6 महिन्यांच्या आत आपले प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा त्याची निवड रद्द होईल, असे वाघमारे म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाची प्रसिद्धी 16 जानेवारी रोजी केली जाईल. त्यानंतर 16 ते 21 जानेवारीपर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 22 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप 27 जानेवारी रोजी दुपारी 3.30 नंतर केले जाईल. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर 7 फेब्रवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here