विश्वासरावांच्या कल्पनेतून साकार झालेल्या राजमाता जिजाऊ गार्डमधून आ. तांबेंची पत्रकार परिषद

0
384

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये संगमनेर सेवा समितीच्या वतीने आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व प्रभागावर उमेदवार दिले असून त्यांची संगमनेर करांना ओळख करून देण्यासाठी आज प्रभाग क्रमांक पाच मधील जनता नगर येथील राजमाता जिजाऊ गार्डनमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेच आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून संगमनेर 2.0 नेमके काय आहे? त्याचे व्हिजन काय आहे? याचा आढावा पत्रकारांसमोर मांडला.

त्याचबरोबर संगमनेर सेवा समिती का स्थापन केली ?त्यामागचा उद्देश काय आहे ? आणि संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आमचे उमेदवार कामे कशी करणार आहेत याचीही माहिती उपस्थितांना दिली. कोणताही नगरसेवक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ठेकेदारी करणार नाही हे प्रतिज्ञा पत्रावर लिहून घेणारा मी आमदार असून याचे तंतोतंत पालन केले जाईल असेही तांबे यांनी सांगितले. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष आणि त्याचे चिन्ह सिंह याचा उपयोग आपण का करत आहोत याचेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

आज 20 नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक पाच मधील जनता नगर येथील राजमाता जिजाऊ गार्डनमध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. प्रभाग ५ (ब) मधून ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक ची उमेदवारी असणारे विश्वासराव मुर्तडक हे संगमनेरचे माजी नगराध्यक्ष असून त्यांच्याच कार्यकाळात आणि त्यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या इंदिरा गार्डन मधून मीही पत्रकार परिषद घेत आहे असे सत्यजीत तांबे यांनी अभिमानाने सांगितले. विश्वासरावांनी तयार केलेले गार्डन उत्कृष्ट असून असेच एकूण ३५ गार्डन तयार केल्याचेही आ. तांबे यांनी सांगितले. ५ (अ) मधून उमेदवारी असलेल्या अनुराधा सातपुते उच्चशिक्षित असून डॉक्टर आहेत. माझ्या व्हिजनला अलाईन असलेले हे उमदेवार आहेत असेही तांबे यांनी सांगितले. एकूण १५ प्रभागातील ३० नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे यांचा परिचय त्यांनी उपस्थितांना करून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here