खांडगाव-धांदरफळ रोडवर भीषण अपघात

0
370

दुचाकी-ट्रक धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – कंपनीतून काम करून घरी परतत असताना पुणे नाशिक महामार्गावरील खांडगाव धांदरफळ रोड उड्डाण पुलावर मंगळवार दि 16 रात्री 11:30 च्या सुमारास दुचाकी आणि ट्रकची जोराची धडक होऊन या दुर्घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव दिनेश राजू लोखंडे (वय 33 रा. संगमनेर खुर्द) असे आहे. दिनेश हा मालपाणी कंपनीत कामाला असून कंपनीचे काम करून घरी परतत असताना दुचाकी एमएच 17 एन 2820 तर मालवाहू ट्रक एमएच 14 एल एस 7191 या दोन वाहनांमध्ये जोराची टक्कर होऊन हा अपघात झाला. हा अपघात एवढा गंभीर होता की, दिनेशच्या डोक्याला, हाताला, पायाला सर्व अंगांना गंभीर मार लागून डावा पाय ही तुटला होता.
अपघात बघणार्‍या पैकी एका व्यक्तीने 112 हा नंबर डायल करताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अ‍ॅम्बुलन्सही तात्काळ येताच दिनेश यास जवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. परंतु तत्पूर्वी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दिनेश लोखंडे यांच्यावर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. संगमनेर स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
दिनेशच्या पश्‍चात वडील राजू, आई मनीषा, पत्नी मनीषा, मुलगा महादू आणि मुलगी श्रेया असा परिवार आहे. शहर पोलिसांनी ट्रक आणि चालकास ताब्यात घेतले असून आकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस मीरा बिबवे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here