अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं

0
2145

२४२ प्रवाशांचे जीव धोक्यात

विमान दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना १ कोटींची मदत, टाटा समूहाकडून आर्थिक मदत जाहीर – गुजरातमधील अहमदाबाद विमान दुर्घटनेत दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर देशभरासह संपूर्ण जगभरातून दुःख व्यक्त केलं जात आहे. टाटा समूहाकडून या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना १ कोटींची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधनअहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधन झाले आहे. रूपाणी हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात होते. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि देशभरात शोककळा पसरली आहे

अहमदाबाद (प्रतिनिधी)- गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाईनर ७८७ प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला असून, मेघानीनगर या नागरी वस्तीत हे विमान कोसळले आहे. तब्बल २४२ प्रवाशांना घेऊन लंडनसाठी निघालेलं हे विमान दुपारी १.३१ वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच काही मिनिटांतच कोसळल्याने मोठा अनर्थ घडला आहे.

या अपघातानंतर घटनास्थळी तत्काळ ३ अग्निशमन गाड्या दाखल झाल्या होत्या. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या विमानातून १० क्रू मेंबर्ससह २४२ प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे, या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी प्रचंड धुराचे लोळ पसरलेले असून, अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आणि सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
हे विमान ७०० फूट उंचीवरून कोसळल्याने मोठ्या स्फोटासह दुर्घटना घडली. लंडनसारख्या दूर अंतरावर जाणारे हे विमान असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात इंधन भरलेले होते. त्यामुळे अपघातानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ही दुर्घटना अहमदाबाद विमानतळाबाहेरील मेघानीनगर परिसरात झाली. विमानतळापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून, घनदाट नागरी वस्ती असल्यामुळे मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवली जात आहे. एअर इंडियाचे हे बोईंग ड्रीमलाईनर ७८७ मॉडेलचे विमान असून, त्याची प्रवासी क्षमतेची मर्यादा ३०० इतकी आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अधिकृत माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here