एज्युकेशन अँड इनोव्हेशन २०२५ पुरस्काराने चैतन्य गिरी सन्मानित

0
641

युवावार्ता (प्रतिनिधी) –
दुबई – शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट दुबई आणि ईएसएन पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘अ‍ॅवार्ड फॉर एक्सलन्स – इन एज्युकेशन मॅनेजमेंट अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ हा मानाचा पुरस्कार चैतन्य श्रीकांत (बापू) गिरी यांना नुकताच दुबई येथे प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी भारतातून काही मोजक्या व्यक्तींची निवड करण्यात आली होती, त्यामध्ये चैतन्य गिरी यांची निवड विशेष गौरवास्पद मानली जात आहे. शिक्षण क्षेत्रात केलेल्या अनुकरणीय योगदानाची ही थेट पावती आहे. पुरस्कार स्वीकारताना चैतन्य गिरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिक्षण व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील माझ्या प्रयत्नांना मिळालेली ही पावती माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या मान्यतेमुळे उत्तमतेच्या सीमारेषा अजून पुढे नेण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते.

या गौरवाच्या क्षणी त्यांनी एमआयटी स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांची सततची प्रेरणा, मार्गदर्शन आणि पाठबळ हेच माझ्या वाटचालीचे खरे बळ आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला एसपी जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट – दुबई, मुंबई, सिंगापूर आणि सिडनी शाखांचे प्रतिनिधी, तसेच मेजर ओमार अल मरझूकी, श्री. घालिब अतातरेह यांची प्रमुख उपस्थिती होती. चैतन्य गिरी हे अमृतवाहिनी बँकेचे संचालक बापू गिरी यांचे चिरंजीव असून, समाजसेवा, शिक्षण आणि विकासाच्या क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत. ‘युएई एज्युकेशन अँड इनोव्हेशन अवॉर्ड 2025’ सारख्या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे त्यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here