‘युथोत्सव’मध्ये 2019 विद्यार्थ्यांची 91 आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट निवड

0
100

2019 विद्यार्थ्यांची थेट निवड; नोकरीसाठी वर्षभर स्वतंत्र विभाग कार्यरत –
टीसीएस, टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा अशा विविध 91 कंपन्यांमधून 2019 विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळणार आहे. यापुढील काळात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत केला जाईल असे आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.

संगमनेर (युवावार्ता प्रतिनिधी)
आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये झालेल्या आय लव संगमनेर चळवळ अंतर्गत युथोत्सव नोकरी मेळाव्यात आज जिल्हाभरातून 7290 तरुणांनी सहभाग नोंदवला. या नोकरी मेळाव्यासाठी आलेल्या 91 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून 2019 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड झाली आहे. युवकांनी जगामध्ये कुठेही जाण्याची तयारी ठेवणे गरजेचे असून हा नोकरी मेळावा तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी ठरणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आय लव संगमनेर लोकचळवळीच्या वतीने आयोजित युथोत्सव नोकरी मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयोजक आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, हर्ष मालपाणी, प्रज्वल भळगट, किरण रहाणे आदींसह विविध कंपन्यांचे एच आर मॅनेजर उपस्थित होते.

या नोकरी मेळाव्यात, कॅम्पस इंटरव्यू, रोजगार, व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगमनेर तालुक्यासह जिल्हाभरातील 7290 युवक व युवतींनी सहभाग नोंदवला. टाटा, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयटी कंपन्या यांसह एकूण 91 कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते.
याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांना करिअरमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आणि नोकरी मिळून देण्यासाठी हा अत्यंत चांगला उपक्रम आयोजित केला आहे.
तर आ. सत्यजीत तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यामध्ये शिक्षणासह अत्यंत चांगल्या सर्व सुविधा निर्माण करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड होणार नाही त्यांच्याकरता प्रशिक्षण देऊन पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न केले जातील. स्कील बेसड् एज्युकेशन असेल तरच यापुढे नोकरीच्या संधी असतील त्यामुळे आपल्याकडील स्कील सेट वाढवावे असही ते म्हणाले.
तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर हे शैक्षणिक हब झाले आहे. नाशिक पुणे मुंबई या मेट्रो शहरांच्या संगमनेर जवळ असल्याने यापुढील काळातही विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या येथे बोलावून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या प्रयत्न हा अत्यंत कौतुकास्पद ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here