लायन्स क्लबच्या वतीने सफायर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

0
65

युवावार्ता(प्रतिनिधी) संगमनेर- लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीने मालपाणी उद्योग समूहाचे प्रेरणास्थान आणि व्यायामाची आवड असणारे उद्योजक स्व. माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ सफायर मॅरेथॉन या स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता मालपाणी लॉन्स येथे केले आहे. स्पर्धेचे हे 12 वर्ष असून स्पर्धकांनी सहभागी होण्यासाठी सकाळी 6.30 वाजता नोव नोंदणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन क्लबचे संस्थापक अध्यक्ष व सफायर मॅरेथॉनचे प्रणेते उद्योजक गिरीश मालपाणी व माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी यांनी केले आहे. सर्व वयोगटातील मुले-मुली, महिला, पुरूष मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ शकतात. मालपाणी उद्योग समूह, स्वदेश प्रॉपर्टीज, मालपाणी बजाज चेतक यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा दोन गटात घेण्यात येणार असून पहिला गट 7 किलोमीटर तर दुसरा गट 10 किलोमीटर धावणार आहे. 7 किलोमीटर धावणार्‍या स्पर्धकांना 4 ठिकाणांवरून टोकण घ्यायचे आहेत तर 10 किलोमीटर धावणार्‍या स्पर्धकांना पाच ठिकाणांहून टोकन घ्यायचे आहे. र्एींशीू र्ठीपपशी ळी थळपपशी या थीमअंतर्गत सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धक हा विजेताच असणार आहे. सहभागी स्पर्धकांना मेडल, सर्टिफिकेट आणि कॅप देण्यात येणार आहे. मॅरेथॉनमध्ये सर्वांसाठी प्रवेश मोफत असून आनंदासाठी आणि आरोग्यासाठी सर्वांनी धावावे असे आवाहन अध्यक्षा स्वाती मालपाणी, सचिव प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, खजिनदार पूजा मर्दा, प्रकल्प प्रमुख एमजेएफ सुनिता मालपाणी, कल्याण कासट, अतुल अभंग, चैतन्य काळे, सुदीप हासे, सुमित मणियार यांनी केले आहे. प्रकल्प यशस्वीततेसाठी महेश डंग, डॉ. अमोल पाठक, राजेश मालपाणी, अजित भोत, उमेश कासट, सीए प्रशांत रूणवाल, चंद्रशेखर गाडे, देविदास गोरे, धनंजय धुमाळ, विशाल थोरात, हरमितसिंग डंग, कृष्णा आसावा, संतोष अभंग, नामदेव मुळे, रोहित मणियार, संदीप गुंजाळ, कल्पेश मर्दा, हरज्योतसिंग बत्रा, शुभम तवरेज, अक्षय गोरले, अनन्या धुमाळ, डॉ. मधुरा पाठक, मंजुषा भोत, नम्रता अभंग, प्रिती काळे, प्रियंका कासट, वंदना मणियार, मिनल अभंग, अंजली पाटील, चैताली जोर्वेकर, पायल शहा आदी सदस्य मेहनत घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here